Home Entertainment सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू अचानक इतकी सडपातळ कशी झाली ह्यावर तिने...

सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू अचानक इतकी सडपातळ कशी झाली ह्यावर तिने स्वतः केला खुलासा

8623
0
actress runku rajguru sairat
actress runku rajguru sairat

नागराज मंजुळे ह्यांचा सैराट हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला. चित्रपटात सर्वच नवखे कलाकार दिसूनआले पण तरी देखील ह्या चित्रपटाने तब्बल १०० कोटींहून अधिक कमाई केली. मराठी चित्रपटात सर्वात जास्त कमाई करण्याचा किताबही ह्याच चित्रपटाने मिळवला. मुख्य करून ह्या चित्रपटातील गाणी आणि संगीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. सामान्य माणसाच्या जीवनात काय घडतं हे स्पष्टपणे दाखवल्यामुळेच हा चित्रपट तुफान गाजला. चित्रपटात आर्ची साकारणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिच्या बद्दलच्या काही खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत..

actress rinku rajguru
actress rinku rajguru

सैराट चित्रपटातील अभिनेत्री दिसायला खूप सुंदर नाही ती काळीसावळी आहे आणि तिची शरीरयष्टी बऱ्यापैकी जाड आहे तरी देखील आपल्या अभिनयाने आणि डायलॉग बोलण्याच्या स्टाइलमुळे ती ती खूपच प्रसिद्ध झाली. ह्या चित्रपटामुळे तिला अनेक चित्रपटात काम करायची संधी देखील मिळाली. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत तिला तिच्या सडपातळ होण्याबद्दल प्रश्न विचारला होता. तेंव्हा तिने तीच वजन कश्याप्रकारे कमी केलं ते सांगितलं होत. सैराट फेम अरची त्यावेळी म्हणाली कि, मी सुरवातीपासूनच जाड होते. खरंतर तुम्ही जाड आहात कि पातळ ह्याचा तुमच्या अभिनयाशी काहीही संबंध नाही. तुम्ही चांगला अभिनय केला तर तुम्हाला लोक नक्कीच पसंत करतात. पण मला अभिनेत्री म्हणून अजून काम करायची ईच्छा आहे. प्रमुख भूमिका करायला कोणाला आवडत नाही. मग त्यासाठी मी सडपातळ होण्याचं मनापासून ठरवलं. सडपातळ होण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाला समजावणं खूप गरजेचं आहे. मी ठरवलं आणि काहीदिवसातच मी आपलं वजन कमी करेल असं नाही त्यासाठी बराच काळ लोटावा लागणार हेही मनात निश्चित केलं, हो मी ते करून दाखवेल अशी जिद्द मनात बाळगली. रोज नियमित व्यायाम करायला सुरवात केली. व्यायामासोबत मी नृत्य देखील करायचे. त्यासाठी मी क्लास देखील जॉईन केला होता.

sairat fil actress archi rinku
sairat fil actress archi rinku

वजन कमी करण्यासाठी खाण्यावर देखील बरच नियंत्रण ठेवलं. भूक नसताना देखील उगाचच अरबट चरबट खान पूर्णपणे बंद केलं. जितकं शक्य होतील तितकं जास्त पाणी प्यायची. पाण्याने भूकेवर देखील नियंत्रण ठेवता येते आणि त्यामुळे चेहऱ्यावर तेज देखील येत. नियमित व्यायाम केल्याने हे सगळं शक्य झालं असल्याचं तिने सांगितलं. मित्रानो वजन कमी करायला खुप महिने लागतात सुरवात करून अर्धवट सोडण्यात काही अर्थ नसतो. बऱ्याच जणांच्या बाबतीत हे नेहमी घडत आज जास्त खाऊ उद्यापासून कमी खाईल इथंच सर्व गणित चुकत. जे ठरवलं ते नियमित आणि योग्य पद्धतीने तेही बराच काळ केल्याने तुम्हीही आपल्या शरीरावर नियंत्रण ठेऊ शकता. ह्यात अवघड असं काहीच नाही. सध्याच्या धावपळीच्या जीवनात स्वतःच्या शारीवर देखील नियंत्रण ठेवणं तितकंच गरजेचं आहे. ‘आरोग्यम् धनसंपदा’ हे आपण बालपणापासून ऐकतो बोलतो. ‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे’ सोने, चांदी, संपत्ती म्हणजे श्रीमंती नव्हे! पैसे मिळविताना तब्येत दुर्लक्षित राहून बिघडली, तर त्या मिळकतीचा उपभोग घेता येणार आहे का? पैसे डॉक्टरकडे जातील आणि शारीरिक हानी होईल ती वेगळीच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here