माझी तुझी रेशीमगाठ मालिका सुरवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. मालिकेत असलेले कलाकार त्यांच्या उत्तम अभिनयाने ह्या मालिकेला वेगळ्याच उंचीवर घेऊन गेलेले पाहायला मिळाले. पण प्रत्येक मालिकेला मर्यादा असतात मालिकेला टीआरपी मिळाला कि मालिका वर्षानुवर्षे तशीच सुरु ठेवण्याचा आजकाल सपाटाच लागला आहे. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेच्या बाबतीत देखील असच काहीस घडलेले पाहायला मिळालं. आता टीआरपी घाला म्हणून मालिकेच्या वेळेत बदल केला आहे पण तरीदेखील मालिका सुरूच ठेऊन नवनवीन कलाकारांना मालिकेत घिसवलेलं पाहायला मिळत. त्यामुळे मुख कथानक बाजूला राहील आणि मालिका नवीन वळण घेताना पाहायला मिळतेय.

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील मुख्य पात्र नेहा अपघातात गेली असा समज आता सगळ्यांनी करून घेतला आहे. मात्र नुकतेच समीर आणि शेफाली डेट करण्यासाठी एका कॅफेमध्ये बसलेले असतात. त्यावेळी कॅफेच्या दाराबाहेर समीरला नेहा दिसते. अर्थात नेहाची आता स्मृती गेली असल्याने ती अनुष्का म्हणून वावरताना दिसत आहे. नेहाला समोर पाहून समीर मात्र पुरता गोंधळून गेला आणि तो तिला भेटण्यासाठी तिच्या मागोमाग गेला. पण समीरच्या फोनवर त्याच्या बहिणीचा फोन आला आणि शेफाली सारीच फोन घेते. या दोघींची भेट होते त्यावेळी शेफाली तिच्या आणि समीरच्या नात्याचा खुलासा करते. मालिकेत समीरची बहीण यावर थोडी नाराज असल्याचं दिसते शेफाली आपल्या भावाला म्हणजेच समीरला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत आहे असं थेट ती शेफालीला म्हणते. खरंतर भाऊबीजेच्या दिवशी समीर आपल्या बहिणीला फोने करून भेटण्यासाठी बोलवत असतो पण आली बहीण आणि माझ्यात आता फार्स चांगलं नातं राहील नसल्याचं तयेवेळी तो यशला बोलतो. रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती चांगली म्हणून तो नेहाला आपली बहीण मानतो. समीरच्या बहिणीची मालिकेत प्रथमच एन्ट्री झाली आहे यापूर्वी तिचा उल्लेख समीरने यशासोबत अनेकदा केला होता पण आता मालिकेत ती पहिल्याच वेळेस पाहायला मिळत आहे. अनेकांना प्रश्न पडला असेल कि हि अभिनेत्री नक्की आहे तरी कोण? चला तर तिच्याबद्दल जाणून घेऊयात…

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत समीरच्या बहिणीची भूमिका अभिनेत्री “योगिनी पोफळे” हिने साकारली आहे. अनेक मराठी चित्रपट आणि मालिकेत तुम्ही तिला यापूर्वी देखील पाहिलं असेलच. “लागीरं झालं जी” या मालिकेत योगिनी पोफळे हिने भैय्या साहेब म्हणजेच किरण गायकवाड च्या बहिणीची भूमिका साकारली होती. लगीर झालं जी या मालिकेपूर्वी देखील तिने अनेक कामे केली आहेत पण झी वाहिनीसारखा मोठा प्लॅटफॉर्म तिला मिळाला आणि काही दिवसातच तिला प्रेक्षकांची पसंती मिळाली. उबंटू, वेडिंगचा सिनेमा, कॉमेडीची बुलेट ट्रेन, हसवा फसवी, हसगत, गाईच्या शापानं या आणि अश्या कित्तेक कामांमुळे ती प्रेक्षांसमोर आली आहे पण खरी प्रसिद्धी तिला झी वाहिनी मुळेच मिळाली असल्याचं ती म्हणते आता पुन्हा माझी तुझी रेशीमगाठ हि झी वाहिनीची मालिका करता येत असल्यामुळे ती खूपच खुश आहे. इतकाच नाही तर नकाब या सीरिजमध्ये मल्लिका शेरावत हिच्या भूमिकेला योगीनीने आवाज दिला आहे. ती एक उत्तम निवेदिका देखील आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेसाठी अभिनेत्री “योगिनी पोफळे” हिला खूप खूप शुभेच्छा…