Home News या कलाकारासोबत तब्बल ५० हजारांची झाली होती लूट पिंपरी चिंचवड पोलिसांनी २...

या कलाकारासोबत तब्बल ५० हजारांची झाली होती लूट पिंपरी चिंचवड पोलिसांनी २ दिवसात जे केलं

1768
0
yogesh sohoni marathi actor news
yogesh sohoni marathi actor news

शनिवारी ८ मे रोजी अभिनेता योगेश सोहनी याच्यासोबत एक भयंकर घटना घडली होती. मुंबई पुणे एक्सप्रेस वे ने तो पुण्याला जात असताना त्याला एका अज्ञाताने हिप्नॉटाईज करून त्याच्याकडून तब्बल ५० हजार रुपये लाटले होते. गेल्या काही दिवसांपासून ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली होती. योगेश सकाळी पावणे आठच्या सुमारास सोमटणे एक्झिट जवळ आला तिथे त्याला एका इसमाने गाडी थांबवण्याचा ईशारा केला होता. त्यानंतर योगेशला दमदाटी करून हिप्नॉटाईज करून त्याच्याकडून एटीएममधून ५० हजार रुपये घेऊन पळून केला होता. त्यानंतर योगेशने ताबडतोब पोलीस ठाण्यात धाव घेतली होती आणि याबत रीतसर तक्रार नोंदवली होती.

shri krushn prakash with actor yogesh sohoni

या घटनेनंतर योगेशला दोन दिवसातच एक चांगली बातमी समजली आज इंस्टाग्रामवरून त्याने एक व्हिडिओ शेअर केला त्यात योगेशने या घटनेत ज्यांनी ज्यांनी त्याला मदत केली त्या सर्व पोलिसांचे, नातेवाईकांचे आणि मित्रमंडळींचे आभार मानले आहेत. यात तो हेही म्हणाला की तक्रार नोंदवल्यानंतर अवघ्या दोन दिवसातच त्या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची ओळख पटण्यासासाठी योगेशला पोलीस स्टेशमध्ये नुकतेच बोलवण्यात आले होते. इसमाची ओळख आता पटली असून पुढील कारवाई साठी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात योगेशने पिंपरी चिंचवडचे पोलीस कमिशनर श्री कृष्ण प्रकाश यांनी योग्य लक्ष घालून न्याय मिळवून दिला त्याबाबत त्यांचे आभार मानले आहेत. एटीएम मधील सीसीटीव्ही फुटेज, टोलनाक्यावरचे फुटेज लवकर मिळाल्याने ह्या तपासाला योग्य ती दिशा मिळत गेली. शिवाय कमिशनर श्री कृष्ण प्रकाश यांनी या घटनेत जातीने लक्ष घातले. अवघ्या दोन दिवसातच त्यांनी या घटनेत बारकाईने लक्ष घातल्याने योगेशने त्यांचे आभार मानले आहेत. या आनंदा सोबतच त्याने चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी सांगितली की लवकरच मुलगी झाली हो या मालिकेचे चित्रीकरणदेखील सुरू केले जाणार आहे. या मालिकेत तो शौनकचे पात्र साकारत आहे त्यामुळे योगेशचा आनंद सध्या द्विगुणित झालेला पाहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here