शांताबाई… हे गाणं काही वर्षांपूर्वी खूप हिट ठरलं होतं लोककलावंत संजय लोंढे यांनी हे गाणं लिहिलं होतं. नुकतेच संजय लोंढे यांच्यावर आर्थिक परिस्थितीमुळे उपासमारीची वेळ आली असल्याचे समोर आले आहे. गेल्या एक ते दीड वर्षांपासून लोककलावंत घरीच बसून आहेत हाताला कुठलेच काम नाही की कुठला कार्यक्रम नाही यामुळे बहुतेक कलाकार परिस्थितीपुढे हतबल झाली आहेत. हातात असलेला पैसाही खर्च झाल्याने आता काय खावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

मध्यंतरी संजय लोंढे यांचे रेकॉर्डिंग चालू होते मात्र पोलिसांनी ते रेकॉर्डिंग बंद पाडले होते. हातात पैसा नसल्याने काय खावे हा प्रश्न त्यांच्यापुढे भेडसावत आहे. काही दिवसांपूर्वी भावाचे निधन झाले त्यावेळी देखील कार्य करण्यासाठी माझ्याकडे पैसेच नव्हते असे ते सांगतात. ह्या वर्षीप्रमाणे गेल्या वर्षी देखील अशाच प्रसंगाला त्यांना सामोरे जावे लागले होते. २०२० मध्ये साधारण एप्रिल महिन्यात पुण्यातील काही ठिकाणी गरीब, बेघर मजुरांना अन्नधान्याचे वाटप सुरू केले होते मंगळवार पेठेतील राजेवाडी येथील झोपडपट्टी भागातून तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांना फोन आला. राजेवाडी येथे गरीब लोकांना धान्य मिळत नाही, अशी तक्रार आली. त्यावर कोलते-पाटील यांनी लगेच या भागात जाऊन धान्याचे वितरण केले. तेथे या भागातील गरजू लोककलावंतांमध्ये गायक, ढोलकी वादक आणि वादक यांचा समावेश होता. त्यांना सोशल डिस्टन्स राखत धान्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ‘शांताबाई’ फेम गायक- संगीतकार संजय लोंढे या रांगेत उभे होते. आणि आताही काम नसल्याने तीच परिस्थिती त्यांच्यावर पुन्हा एकदा ओढवलेली दिसून येत आहे.