देवमाणूस मालिकेत आता देवीसिंग म्हणजेच डॉक्टर अजित कुमार देव याला दिव्या सिंगने अटक केली आहे. त्याच्या विरुद्ध अनेक पुरावे कोर्टात हजार देखील केलेले पाहायला मिळतायेत. आर्या मॅडम सरकारी वकील असल्याने देवीसिंग विरोधात केस लढताना दिसतेय. त्यामुळे मालिकेत आणखीन नवा ट्विस्ट आलेला पाहायला मिळतोय. इकडे पुरावे मिटावे त्याकरता डॉक्टर डिम्पलला अनेक सूचना देतो पण त्या तिला पूर्ण करता येत नाही उलट तिच्यामुळेच आता देवीसिंग आणखीन अडकणार असे पाहायला मिळणार आहे.

मालिकेत आर्या मॅडम साकारतोय अभिनेत्री “सोनाली पाटील”. सोनाली पाटील हिला तुम्ही याअगोदर टिकटॉकवर पाहिलेच असेल.टिक टॉक वरील तिचे व्हिडीओज प्रचंड गाजल्याने तिला मराठी मालिकेत काम करायची संधी मिळाली होती. ५ मे रोजी लातूर येथे सोनालीचा जन्म झाला.आपले शिक्षण तिने ताराराणी विद्यापीठ, उशाराजे हायस्कूलमधून केले. तर कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातून तिने पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. पुढे एमए आणि बीएडची पदवी देखील तिने प्राप्त केली आहे. त्या पेशाने शिक्षिका आहेत. त्यांनी वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम देखील केले आहे. सोनालीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती तिची आवड तिने टिक टॉक वरील व्हिडीओजच्या माध्यमातून चाहत्यांसमोर आणली होती. तिच्या व्हीडोजला चाहत्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत होता. याचमुळे तिला मराठी मालिका साकारण्याची संधी मिळाली होती. स्टार प्रवाहवरील “वैजू नं 1” मालिकेत तिने वैजूची भूमिका साकारली होती. याअगोदर घाडगे अँड सून मालिकेत प्रियांकाचे पात्र तसेच जुळता जुळता जुळतंय की मालिकेतून तिने रेखाचे पात्र साकारले होते. वैजू नं 1 ही तिची मध्यवर्ती भूमिका असलेली पहिलीच टीव्ही मालिका होती.

नुकताच अभिनेत्री सोनाली पाटील हिने एक डान्स व्हिडिओ चाहत्यांशी शेअर केला आहे त्यात अभिनेता किरण गायकवाड देखील मनमुराद डान्स करताना पाहायला मिळतोय. सोनाली पाटील हि नेहमीच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या डान्स चे नवनवीन व्हिडिओ बनवून टाकताना तुम्ही ह्यापूर्वीही पहिले असेलच. ह्या व्हिडिओमुळे मालिका गंभीर विषयावर असली तरी अभिनेते मात्र मनमुरादपणे डान्सचा आनंद घेताना दिसतायेत. मालिकेत आता अंतिम टप्प्यात असली तरी आणखीन बरेच भाग होतील ह्यात शंका नाही.
A post shared by Sonali Patil (@sonalipatil_official)