महेश मांजरेकरांना आपण अभिनेते, दिग्दर्शक, कथाकार व निर्माते म्हणून ओळखतो. मराठी रंगभूमी आणि चित्रपटांत त्यांचा मोलाचा वाट आहे. मराठीच नाही तर बॉलीवूडमधेही त्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलं. महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेले वास्तव हा हिंदी चित्रपट खूपच लोकप्रिय झाला होता. १९८४ साली अफलातून ह्या मराठी नाटकामधून त्यांनी अभिनयाला सुरवात केली होती. त्यांना आजवर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार व दोन स्क्रीन पुरस्कार मिळाले आहेत. दिग्दर्शनाशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांत अभिनयही केला आहे त्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या चित्रपटांचाही समावेश आहे. ‘कांटे’या चित्रपटामुळे त्यांना अभिनयात यश मिळण्यास सुरुवात झाली.

वास्तव, अस्तित्व, कुरुक्षेत्र, जिस देश में गंगा रहता है, एहसास , हत्यार अश्या एका हुन एक हिंदी बॉक्स ऑफिसावर धुमाकूळ घालणाऱ्या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. तर मराठी देखील शिक्षणाच्या आयचा घो, लालबाग परळ, कुटुंब, काकस्पर्श, मातीच्या चुली अश्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली. आजवर असंख्य नाटकांच्या निर्मितीची दूर देखील त्यांनी सांभाळली. मुक्तीच्या त्यांच्या बाबत एक दुखत बातमी समोर आली आहे. महेश मांजरेकर यांना मूत्राशयाच्या कर्करोगाचे झाल्याचे निदान समोर आले आहे. मूत्राशयाच्या कर्करोगाच्या उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं नुकतीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे. मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात हि शस्रक्रिया करण्यात आली व ते आता लवकरच रुग्णालयातून घरी जाणार असल्याची बातमी समोर आली आहे. मराठी आणि हिंदीत आपलं नाव लौकिक मिळवणाऱ्या महेश मांजरेकरांना उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी पार्थना…