“चला हवा येऊ द्या” या शोमुळं अंकुर वाढावे प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचला. तो एक चांगला अभिनेता तर आहेच हे चला हवा येऊ द्या च्या मांचावरून आपल्याला पाहायला मिळालेच परंतू तो एक चांगला कवी देखील आहे हे बहुतेकांना परिचयाचे नसावे. ‘पुन्हा प्रेमगीत गाण्यासाठी’ हा त्याचा कवितासंग्रह प्रकाशित झाला होता. अंकुरनं सुरुवातीला अभिनेते संजय नार्वेकर यांच्यासोबत एका नाटकात काम केलं होत. त्या संधीचं अंकुरनं सोनं केलं. पुढं त्याने गेलो गाव, गाढवाचं लग्न, सर्किट हाऊस,आम्ही सारे फर्स्ट क्लास , सायलेन्स , कन्हैय्या यासारख्या नाटकांमध्ये भूमिका साकारल्या.

जलसा’ या मराठी चित्रपटातही त्यानं काम केलं होतं. यानंतर त्याला ‘चला हवा येऊ द्या’मध्येही काम करण्याची त्याला नामी संधी मिळाली आणि या संधीमुळे तो प्रेक्षकांच्या घराघरात जाऊन पोहोचला. नुकतीच सोशिअल मीडियावर त्याने एक पोस्ट शेअर केली त्या पोस्टमुळे त्याच्यातील आणखीन एक गुण समोर आला. अंकुर पूर्वी लगीन सराईत भांड्यावर नाव टाकायचे काम करायचा. त्याचे अक्षर चांगले असल्यामुळे त्याला अनेक कामे देखील मिळत होती. एका भांड्यावर नाव टाकायचे तो २ रुपये घायचा. दिवसभरात भांड्यांवर नावे टाकून जवळपास त्याला १०० रुपये मिळायचे. येत्या काही दिवसातच अंकुरच्या बहिणीचे लग्न आहे त्यामुळे भांड्यांवर नाव टाकण्यासाठी त्याने पुन्हा हातात मशीन घेतली आणि जुने आठवणीतले दिवस आठवले. अंकुर आज कितीही मोठा झाला चांगले पैसे कमवायला लागला तरी तो आपले जुने दिवस विसरला नाही. उलट जुन्या आठवणींना उजाळा देत त्याने ते काम देखील केलं. ह्यातूनच तो एक उत्तम कलाकारच नाही तर एक उत्तम माणूस देखील आहे हे लक्षात येत. त्याच्या जिद्दीला त्याच्या चिकाटीला सलाम…भावा जिंकलस..