Home Entertainment गणपत पाटील यांच्या पत्नीचे निधन…कोल्हापूर येथे घेतला अखेरचा श्वास

गणपत पाटील यांच्या पत्नीचे निधन…कोल्हापूर येथे घेतला अखेरचा श्वास

1599
0
pramila ganpat patil news
pramila ganpat patil news

गणपत पाटील म्हटलं की मराठी सृष्टीतील नाच्याची भूमिका अजरामर करणारे अभिनेते लगेचच आठवतात. गणपत पाटील यांना आपल्यातून जाऊन १४ वर्षे लोटली आहेत. त्यांच्या पश्चात काल १ सप्टेंबर २०२३ रोजी त्यांच्या पत्नी प्रमिला गणपत पाटील यांचेही दुःखद निधन झाले आहे. काल शुक्रवारी कोल्हापूर येथे वृद्धापकाळाने प्रमिला पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला. गणपत पाटील यांच्या संसाराचा गाडा प्रमिला मावशींनी आपल्या खांद्यावर पेलला होता. मान अपमान सहन करत आपल्या मुलांना त्यांनी वाढवलं होतं. कलाकार म्हणून त्यांनी गणपत पाटील यांना अखेरपर्यंत खंबीर साथ दिली होती. समाजातून मिळणारी वाईट वागणूक या सर्वांची पर्वा न करता नवऱ्याला त्यांनी कायम साथ दिली.

ganpat patil wife pramila ganpat patil
ganpat patil wife pramila ganpat patil

खरं तर नाच्याच्या भूमिकेमुळे गणपत पाटील यांना समाजात वावरताना मोठा अपमान पचवावा लागला होता. कारण अशा भूमिका साकारणाऱ्या कलाकाराला एकेकाळी हीन दर्जाची वागणूक दिली जात असे. मराठी सृष्टीत अशी भूमिका त्यांनी अजरामर केली. नटरंग या चित्रपटाने त्यांच्या भूमिकेचा सन्मान केला. पण हा सन्मान पाहायला गणपत पाटील हयातीत नव्हते ही खंत अनेकदा व्यक्त होते. गणपत पाटील यांनी बालवयातच नाटकातून काम करण्यास सुरुवात केली होती. पुढे कॉलेजमध्ये असताना त्यांना कुमारिकेची भूमिका मिळाली. चित्रपटातून त्यांनी खलनायक सुद्धा साकारला मात्र नाच्याची भूमिका त्यांच्यासाठी मैलाचा दगड ठरली.

ganpat patil with award
ganpat patil with award

त्यांना या भूमिकेमुळे ओळख मिळाली असली तरी खाजगी आयुष्यात मात्र त्यांच्या वाट्याला अवहेलना आली. मुलामुलींची लग्न जमवताना त्यांना नावे ठेवण्यात आली. या लोकांना मुलं कशी होतात असे प्रश्न पाहायला येणारी पाहुणे विचारू लागली तेव्हा गणपत पाटील हा किस्सा सांगताना भावुक झाले होते. या प्रवासात गणपत पाटील यांना पत्नी प्रमिला यांची साथ मिळाली. काल प्रमिला पाटील यांच्या निधनाने मोठी हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. प्रमिला गणपत पाटील यांना आमच्या समूहाकडून भावपूर्ण श्रद्धांजली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here