अवधूत गुप्ते यांच्या झी मराठी वाहिनीवरील ‘खुप्ते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमामध्ये अनेक कलाकार मंडळींनी तसेच राजकारण्यांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ‘संजय राऊत’ यांच्या खूप ते तिथे गुप्ते या कार्यक्रमामधील अनेक क्लिप्स वायरल होत आहेत. दरम्यान हा कार्यक्रम येत्या 25 जूनला ‘झी मराठी वाहिनीवर’ दाखवण्यात येणार आहे. प्रोमो पाहून अनेकांना कार्यक्रम पाहण्याची उत्सुकता लागली आहे. 25 जूनला प्रदर्शित होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये संजय राऊतांसोबत चांगल्याच गप्पा रंगणार असल्याचं दिसतंय. वायरल झालेल्या प्रोमोमध्ये दिसतंय की, एका मॅजिक बॉक्समध्ये काही राजकारणांचे फोटो आहेत. ते फोटो पाहून त्यांचे भविष्य काय असेल, त्यांच्या भवितव्यात ते कोण असतील याबद्दल संजय राऊत आणि सांगायचं आहे. दरम्यान राऊतांना माजी मुख्यमंत्री ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ यांचा फोटो दाखवण्यात आला तेव्हा ते म्हणाले की,” पुन्हा मुख्यमंत्री होणार.

त्यानंतर राऊतांना अजित पवार आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो दाखवण्यात आले. या दोघांचे फोटो पाहिल्यानंतर संजय राऊतांच्या काय प्रतिक्रिया असणार आहेत हे सध्या गुलदस्त्यात असून, उद्या होणाऱ्या कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांना कळणार आहे. अशातच राऊत साहेब त्या दोघांचं नेमकं कोणत भवितव्य सांगणार आहेत याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. अशातच गुप्तेंच्या या कार्यक्रमावर काही प्रेक्षक नाराज झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. हा कार्यक्रम मनोरंजनाचा असून कलाकार कमी आणि राजकारणी जास्त दिसत आहेत. असं काही प्रेक्षकांचं म्हणणं आहे. आधी राज ठाकरे मग नारायण राणे आणि संजय राऊत एकामागून एक एन्ट्री झाल्याने हा राजकीय कार्यक्रम आहे कि काय असं म्हणत प्रेक्षकांनी रोष व्यक्त केला आहे.