बिगबॉसच हे ४ थ पर्व सुरु आहे. घरातून बाहेर पडलेली अभिनेत्री रुचिरा जाधव हिने नुकतंच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक भावुक पोस्ट शेअर केलेली पाहायला मिळतेय. अभिनेत्री रुचिरा जाधव हिचे मोठे बाबा यांचा आज ७१ वा वाढदिवस आहे पण काही महिन्यांपूर्वीच त्यांचं दुःखद निधन झालं. तिचे मोठे बाबा भारतीय सैनिकात होते. त्यांच्याबद्दल लिहताना ती म्हणते ” माझे आण्णा.. माझे मोठे बाबा… माझे मोठे काका आज त्यांचा ७१ वा वाढदिवस Big boss House मधे जाण्याच्या ४ दिवस आधी अचानक आम्हां सगळ्यांना सोडून देवाघरी गेले. त्यांचं घर म्हणजे माझ्यासाठी लहानपणापासूनच माझं हक्काचं दुसरं घर. ते ज्या दिवशी गेले, त्यादिवशी माझी BIGG BOSS च्या Grand Premiere performance ची Technical rehearsal होती.

अर्थात त्या दिवशी मी त्यात सहभागी होऊ शकले नाही, कारण मी तातडीने पुण्याला गेले आणि तालीम दुसऱ्या दिवशी पुढे ढकलण्यात आली.. पूण्याच्या घरी पोचल्यावर माझा पाय तिथून निघत नव्हता.आईला सोडून निघावसं वाटत नव्हतं.जवळपास मी show करणार नाही असंच सगळं होतं. त्यावेळी माझे भाऊ मला म्हणले होते कि सैनिकाच्या मुलीने असं महाघोर घेऊ नये “Soldier’s daughter never quit” Yes my आण्णा is a soldier. (अजूनही मी is म्हणते, was म्हणायला मला जमत नाही. माझ्या कान्हा ने गीतेत सांगितलेल्या सगळ्या गोष्टींपैकी ही एक गोष्ट तेवढी या छोट्याशा जीवाला समजायची राहिलीये.) त्या रात्री मी travel करून पहाटे Mumbai ला पोहोचून studio ला जाऊन technical show साठी sensual act चा performance दिला होता. I still don’t know how I did that, what made me do that, but I can proudly say that, Artist within me followed the oath.. “SHOW MUST GO ON” And I’m proud of myself about that. BB House मध्ये कित्येकदा मला हिणवलं जायचं. “You are very emotional” म्हणून आणि यावर माझं नेहमी एकच उत्तर राहिलंय…My EMOTIONS ARE MY STRENGTH and not my weakness ! आजच्या दिवशी Bhaiya wanted to give surprise tribute to आण्णा He sang for the first time. I just accompanied.

मी स्वतः Shoot आणि DIRECTION केलेला हा 2nd video.फार काही नाही, फक्त माझ्या भावना ओतल्यात मी त्यात. कारण मला फक्त Feel कळतो. And the challenging part was “सगळे shots घरातल्यांच्या नकळत घेतलेत.”But when they saw the video with smile, surprise and the teary eyes….. My Soul smiled आण्णा मला अवगत असलेल्या कलेमधून मी तुम्हाला वंदन करू शकले, मी धन्य झाले. Your Ruchi promises you that, “You’ll always be proud of me” आणि तुम्ही आहात आमच्यासोबत.. कायम”. अभिनेत्री रुचिरा जाधव हिने एक सुंदर गाणं आणि बाबांच्या जीवनातील आठवणीतले अनेक फोटो त्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केले आहेत. घरातील आपली आवडती व्यक्ती अचानक अशी निघून गेल्याने ती भावुक झालेली पाहायला मिळत आहे. अनेक अभिनेते आणि तिच्या चाहत्यांनी बाबांना श्रद्धांजली वाहिलेली पाहायला मिळत आहे.