कोरोना महामारीनंतर आता जेव्हा पासून नाट्य गृह आणि चित्रपट गृह सुरू झाले आहेत तेव्हापासून प्रेक्षकांसह कलाकार देखील मोठे उत्सुक दिसत आहेत. अशात सर्वच कलाकरांसह अभिनेता अंशुमन विचारे देखील जोमाने रसिक प्रेक्षकांच्या सेवेत रुजू झाला आहे. अंशुमनचे ‘हौस माझी पुरवा’ हे नाटक २६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाले आहे. नाटक प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांनी त्याला मोठा प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे. अस्मय प्रकाशित भूमिका थेटर कडून या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. या मध्ये प्राप्ती बने बरोबर अनेक कलाकारांनी अभिनय केला आहे.

अंशुमनची चिमुरडी कायमच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. ‘हौस माझी पुरवा’ नाटकाच्या सेटवर सराव सुरू असताना देखील तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या मध्ये अन्वी कलाकारांसह डान्स करताना दिसली होती. यासह आता आजी बरोबरचा तिचा आणखीन एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अंशुमन विचारेने आजवर मराठी सिनेसृष्टी चांगलीच गाजवली आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये तसेच नाटक आणि मालिकांमधून दमदार अभिनय केला आहे. श्वास, भरत आला परत, वरात आली घरात, मिसळ पाव अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. कलर्स मराठी या चॅनलवरील ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या शोमधून तो मोठ्या प्रकाशझोतात आला. ‘फू बाई फू’ या शोमधून देखील त्याला विशेष प्रसिध्दी मिळाली. अंशुमनने अजवर अनेक भूमिका साकारल्या आहेत. मात्र त्याचा विनोदी भूमिकेतील अभिनय सर्वांनाच खूप आवडतो. त्यामुळेच ‘फू बाई फू’ या शोच्या दुसऱ्या पर्वाचा तो विजयी ठरला. ‘सारे सारे गाऊया’, ‘पंढरीची वारी’, ‘चालता बोलता’ अशा काही कर्यामांचे सूत्रसंचालन देखील त्याने केले आहे. तसेच मी मराठी वरील त्याचा ‘खाऊ गल्ली’ हा कार्यक्रम पाहून अनेक खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटलं आहे. अशात अंशुमनचे आता आलेले नवीन नाटक देखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.