Home Movies केळे वालीनंतर आता पांडू चित्रपटाचं दादा परत याना गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..

केळे वालीनंतर आता पांडू चित्रपटाचं दादा परत याना गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..

1166
0
sonalee kulkarni and bhau kadam
sonalee kulkarni and bhau kadam

झिम्मा चित्रपटानंतर आता अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लवकरच पांडू या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा एक सुपर कॉमेडी चित्रपट आहे. ज्यामध्ये विनोदी कलाकार भालचंद्र कदम (भाऊ कदम) आणि कुशल बद्रिके या दोघांची जोडी देखील झळकणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. अशात डिसेंबर महिन्यातच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. भाऊ कदम आणि कुशल बद्रिके या दोघांची जोडी ‘चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर चांगलीच गाजली आहे.

pandu film sonalee kulkarni
pandu film sonalee kulkarni

अशात आता पांडू चित्रपटात हे दोघे विनोदी हवालदाराची भूमिका साकारणार आहेत. अशात २९ नोव्हेंबर रोजी या चित्रपटाचं ‘दादा परत या ना’ हे गाणं प्रदर्शित झालं. तसेच या चित्रपटाच्या गाण्यांचे लॉन्चिंग देखील झाले आहे. याची माहिती स्वतः अप्सरा म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिली आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत या विषयी माहिती दिली. गाण्याच्या लॉन्चिंगवेळी संपूर्ण टीम तेथे उपस्थित होती. सोनालीने ही पोस्ट शेअर करत कमेंटमध्ये लिहिले आहे की, “किती दिवसांनी म्युझिक लॉन्च सोहळा झाला. एका चित्रपटाचा म्युझिक अल्बम श्रोत्यांना आवडतोय. सगळीकडे गाणी ट्रेंडतायत.” या सर्वांचं श्रेय देखील काही कलाकारांना देत पुढे तिने लिहिले आहे की, “याचं श्रेय अवधूत गुप्ते, विजू माने, वैशाली सावंत, आदर्श शिंदे, वैभव जोशी, यांच्यासह झी मराठी म्युझिक यांना जातं.” पुढे तिने झिम्मा चित्रपटाचा उल्लेख देखील केला आहे.

pandu marathi film
pandu marathi film

सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या अनोख्या आदांनी प्रेक्षकांना घायाळ करते. अशात पांडू चित्रपटातील तिच्या ‘केळे वाली’ या गाण्याने देखील अनेकांची मने जिंकली. या गाण्यात ती आणि भाऊ कदम या दोघांचा भन्नाट डान्स पाहायला मिळाला. तसेच भ्रूम भ्रूम या गाण्याला देखील प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. यामध्ये सोनाली मराठमोळ्या तसेच वेस्टन लूकमध्ये झळकली. तिचे दोन्ही लूक आणि तिचा डान्स प्रेक्षकांना खूप आवडला. अनेकांनी सोशल मीडियावर कमेंट मार्फत तिच्यावर कौतुकाचा वर्षावही केला. सोनालीने नटरंग, पोस्टर गर्ल, मितवा, तुला कळणार नाही, हिरकणी आणि झिम्मा असे अनेक हिट चित्रपट या मराठी सिनेसृष्टीला दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here