Home Movies मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात लवकरच झळकणार बॉलिवूडमध्ये

मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात लवकरच झळकणार बॉलिवूडमध्ये

1660
0
rajeshwari kharat in bollywood
rajeshwari kharat in bollywood

मराठी सिनेसष्टीत स्टार घडवणारे दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. नागराज यांनी आजवर अनेक कलाकारांना चित्रपटात अभिनयाची संधी देऊन त्यांना मोठं स्टार केलं आहे. अशात फॅन्ड्री या चित्रपटामध्ये जब्या आणि शालीची जोडी खूप गाजली. अशात प्रत्येकच मराठी कलाकार बॉलिवूडमध्ये जाण्याचे स्वप्न पाहात असतो. तेच स्वप्न शालू म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री राजेश्वरी खरातने देखील पाहिलं, आणि आता ती तिचं हे स्वप्न पूर्ण करताना दिसत आहे.

actress rajeshwari kharat
actress rajeshwari kharat

अमोल भगत यांच्या दिग्दर्शनात पुणे टू गोवा हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. तसेच यामध्ये राजेश्वरी खरात देखील एका भूमिकेत झळकणार आहे. याची माहिती मिळताच राजेश्वरीचे सोशल मीडियावर मोठे कौतुक सुरू झाले आहे. तिने तिच्या आयुष्यात गाठलेला हा टप्प खरोखरंच आव्हानात्मक आणि कौतुकास्पद आहे. पुणे टू गोवा या चित्रपटामध्ये निर्मितीची जबाबदारी आदित्यराजे आणि मोर्या प्रोडक्शन हाऊसकडे आहे. हा एक कॉमेडी, सस्पेन्स, एक्शन आणि ड्रामाने संपूर्ण असलेला चित्रपट आहे. २००७ साली बॉम्बे टू गोवा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉलिवूडमधील हा चित्रपट देखील कॉमेडी, सस्पेन्स, एक्शन आणि ड्रामाने भरलेला होता. त्यामुळे या चित्रपटाच्या कथेवर आधारित पुणे टू गोवा हा चित्रपट असावा अशी शक्यता नेटकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

fandry film actress rajeshwari kharat
fandry film actress rajeshwari kharat

राजेश्वरी फॅन्ड्री चित्रपटानंतर चांगलीच प्रकाशझोतात आली. त्यानंतर मधला काळ ती अभिनयापसून दूर होती. मात्र सोशल मीडिया मार्फत ती कायमच चाहत्यांच्या मनोरंजनासाठी सज्ज होती. ती कायमच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. अशात आता तिने बॉलिवूडमध्ये घेतलेली झेप पाहता राजेश्वरी लवकरच एक मोठी आणि नावाजलेली बॉलिवूड अभिनेत्री होणार असं म्हणायला हरकत नाही. कारण राजेश्वरी ही एका सामान्य कुटुंबतील आहे. अशात फॅन्ड्री नंतर तिला स्वतःमधील अभिनयाचा गुण समजला आणि तिने आता अभिनयामध्येच करिअर करायचं असं ठरवलं. त्यामुळे आयटमगिरी चित्रपटात देखील ती झळकली होती. आता चाहत्यांना तिच्या आगामी चित्रपटाची ओढ लागलेली दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here