Home Entertainment अरे बापरे! इंडियन आयडल मराठीचा सपर्धक कैवल्य गाणं गाता गाता झाला भावूक

अरे बापरे! इंडियन आयडल मराठीचा सपर्धक कैवल्य गाणं गाता गाता झाला भावूक

917
0
kaivalya kejkar in indian idol

साल 2004 पासून हिंदीमध्ये सोनी टीव्हीवर इंडियन आयडल हा शो आपण पाहत आलेलो आहोत. अशात आता सोनी मराठी या चॅनलवर मराठी भाषिक गायकांसाठी इंडीयन आयडल मराठी हा शो सुरू करण्यात आला आहे. हा शो सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांनी याला उत्तूर्त प्रतिसाद दिला. मराठी संगीत सृष्टीतील अनेक होतकरू आणि संगीतात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांनी इथे सहभाग घेतला.

marathi india idol
marathi india idol

यात अनेक स्पर्धकांना आपले नशीब आजमावन्याची संधी दिली गेली. अशात ऑडिशन नंतर 14 स्पर्धकांना गोल्डन माईक मिळाला. ज्यामध्ये कैवल्य केजकर, भाग्येश्री टिकले, अमोल सकट, ऋतिकेश शेलार, अश्विनी मिठे, जगदीश चव्हाण, अविनाश जाधव, शुभम खंडाळकर, श्वेता दांडेकर, चैतन्य देवढे, आम्रपाली पगारे, सागर म्हात्रे, सुरभी कुलकर्णी आणि प्रतिक सिलसे या स्पर्धकांची नावे सामील आहेत. या स्पर्धकांना निवडताना संपूर्ण सेटवर मोठं धाकधुकीच वातावरण पसरलं होतं. तसेच उर्वरित 4 स्पर्धकांना इंडियन आयडल मराठीचा निरोप घ्यावा लागला. आता पुढील शो मध्ये गेलेले स्पर्धक पुन्हा एकदा त्यांच्या नवीन गाण्याच्या तयारीत मग्न झाले आहेत.

सर्वच स्पर्धक जोमाने तयारी करताना दिसत आहे. खरतर आधी फक्त 12 स्पर्धकांना गोल्डन माईक मिळणार होता. मात्र प्रेक्षकांनी आणखीन दोन जणांना सुवर्ण संधी दिली. अशात आता सोनी मराठी चॅनलच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पुढील भागाचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये कैवल्य एक सुरेल गाणं गाताना दिसत आहे. हे गाणं गात असताना तो खूप भावूक होतो. सेटवर त्याचे अश्रू पाहून इतर स्पर्धकांचे डोळे देखील पणवतात. त्यानंतर उपस्थित परीक्षक त्याच्या जवळ जाऊन त्याची समजूत घालताना दिसतात. या सर्वांमध्ये आता कैवल्य नेमका भावुक का झाला असावा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र याचा उलगडा 6 आणि 7 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या भागात कळणार आहे. त्यामुळे रात्री 9 वाजता सोनी मराठीवर पुढील भाग पाहायला विसरू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here