Home Entertainment तुझ्या घरचे तुझी पोस्ट वाचत नाहीत का? असं म्हणणाऱ्या व्यक्तींना अभिनेत्री हेमांगी...

तुझ्या घरचे तुझी पोस्ट वाचत नाहीत का? असं म्हणणाऱ्या व्यक्तींना अभिनेत्री हेमांगी कवी हिने दिलं हे हटके उत्तर

5964
0
heamngi kavi dhumal family
heamngi kavi dhumal family

सोशिअल मीडियावर अनेक अभिनेते अभिनेत्री नेहमीच व्यक्त होताना पाहायला मिळतात. मराठी अभिनेते देखील आजकाल अनेक पोस्टमधून अनेक समस्या आणि वेगवेगळे विषय मांडताना पाहायला मिळतात. मराठी अभिनेत्री हेमांगी कवी आपल्याला नेहमीच महिलांच्या गंभीर समस्या मांडताना पाहायला मिळतात, अनेक व्यक्तीं विशेष करून महिला वर्गाचा तिला पाठिंबा मिळालेला पाहायला मिळतो पण अनेक व्यक्तींना तीच हे उघडपणे बोललेलं पटत नाही मग तिला अनेक टोमणे वाचायला मिळतात. तुला असले विषय घेऊन काय साध्या करायचंय? तुझे घरचे तुझ्या पोस्ट वाचत नाहीत का? हा विषय काय सोशिअल मीडियावर मांडायचा विषय आहे का? असे एक ना अनेक प्रश्न तिला लोक विचारतात. नुकतीच तिने अश्या व्यक्तींना एक सडेतोड उत्तर दिल आहे ती म्हणते …

actress hemangi kavi family
actress hemangi kavi family

मराठी अभिनेत्री हेमांगी कवी धुमाळ हिने रक्षाबंधनाच्या निमित्ताने नुकतीच एक पोस्ट लिहली आहे त्यात ती टीका करणाऱ्या अश्या लोकांना उद्देशून म्हणते “मी social media वर जे काही लिहिते, व्यक्त होते किंवा कुठले ही photos, videos share करते त्यावर लोकांची हमखास एक reaction असते…. तुझे घरचे social media वर नाहीयेत का? घरचे म्हणजे खासकरून घरातली पुरुष मंडळी… बाबा आणि भाऊ! हो आहेत की! बाबा होते पण ते आता नाहीयेत पण माझा भाऊ आहे social media वर आणि तो बघतो, वाचतो माझ्या सगळ्या posts! त्यावर दादाची एकच reaction असते… Good or Bad मी आहे तुझ्यासोबत! तुझं रक्षण करायला! लहानपणी राखी पौर्णिमेच्या दिवशी औक्षण करून एक धागा बांधायचा आणि मोबदल्यात जे काही मिळायचं/ मिळवायचं gift, पैसे पासून ‘मी आहे तुझ्यासोबत’ हे gift आणि पैशा पलीकडे गेलेलं नातं खूप भारी आहे…म्हणूनच मी नाही घाबरत! राखी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here