Home Entertainment आजारी म्हणून बिग बॉसमधून एक्सिट घेतलेल्या शिवलीला पाटील आज करणार कीर्तन? सोशिअल...

आजारी म्हणून बिग बॉसमधून एक्सिट घेतलेल्या शिवलीला पाटील आज करणार कीर्तन? सोशिअल मीडियावर चर्चेला उधाण

14144
0
shivlila patil news
shivlila patil news

काही दिवसांपूर्वी कीर्तनकार शिवलीला पाटील ह्यांनी बिगबॉसच्या घरात एन्ट्री घेतली आणि सर्वानींच्या तिच्या ह्या शो मध्ये जाण्यावर आक्षेप घेतला. बिगबॉस मध्ये तिने खेळात सहभाग देखील दर्शवला नव्हता म्हणूनच कि काय तिने त्या शोमधून माघार घेण्यासाठी आजारी असल्याच नाटक केल्याचं अनेकांचं मत आहे. एका व्हिडिओ द्वारे तिने माझी प्रकृती खालावली असल्याने आणि शरीर साथ देत नसल्याचे सांगत मी बिगबॉसच्या घरातून एक्सिट घेत असल्याचे सांगितले होते. त्या व्हिडिओमध्ये ती हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असल्याचं देखील दर्शवलं होत. हा विषय इतक्यात संपतो न संपतो तर आतासोशिअल मीडियावर आणखीन एका फोटोची तुफान चर्चा पाहायला मिळतेय.

kirtankar shivlila patil
kirtankar shivlila patil

बिगबॉसमधून आजारी असल्याचे कारण सांगत शिवलीला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असल्याचे दाखवत आहेत पण आज ५ ऑक्टोबर २०२१ रोजी तिचे कीर्तन असल्याचा एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. जर कीर्तनकार शिवलीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असून ट्रीटमेंट घेत असेल तर इतक्यात ती बरी होऊन पुन्हा कीर्तन कसकाय सादर करणार असा सवाल अनेकजण विचारताना पाहायला मिळतात. फोटोमध्ये कै. लता राऊत यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ५ ऑक्टोबर २०२१ रोजी म्हणजेच आज मंगळवारी समाजप्रबोधनकार ह. भ. प. शिवलीला ताई पाटील आता चक्क कीर्तन करणार आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा पुरावा खरा आहे की खोटा हे मात्र अजूनही स्पष्ट झाले नसले तरी तिच्या विरोधात कोणी डाव तर नाही ना टाकत हे येत्या काही दिवसातच अधिक स्पष्ट होईल. पण अनेकांनी हा फोटो खर असल्याचं देखील सांगितलं आहे. खर काय हे काही दिवसात स्पष्ट होईलच. पण बिग बॉसच्या घरात गेल्यामुळे शिवलीला पाटील यांना अनेक टीकाकारांना सामोरे जावे लागणार हे देखील तितकच खर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here