आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवर अभिनेते मिलिंद गवळी यांना आश्चर्यचकित करणारा एक चांगलाच अनुभव आला आहे. तब्बल १४ वर्षांनी हा मुलगा त्यांची भेट घेण्यासाठी थेट रत्नागिरीहून सेटवर हजेरी लावतो तेव्हा मिलिंद गवळी खूपच भावूक होऊन जाताना दिसतात. या मुलाबद्दल त्यांनीच खुलासा करून एक आठवण शेअर केली आहे. २००६ साली “काल भैरव” हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश रणदिवे यांनी केले होते. या चित्रपटात मिलिंद गवळी यांनी प्रमुख नायकाची भूमिका साकारली होती त्यात त्यांना एक मुलगा असल्याचे दर्शवले होते.

चित्रपटात एक सिन शूट केला होता ज्यात त्या एक वर्षाहून लहान असलेल्या चिमुरड्याला कोब्रा सापासोबत ठेवले होते. कोल्हापूर येथिल किशाभाऊ मळ्यात याचे चित्रीकरण करण्यात येत होते. मिलिंद गवळी या सिनची आठवण करून देताना म्हणतात की…मला हा सिन आजही चांगलाच लक्षात आहे कारण हा मुलगा कोब्रासोबत दाखवला जाणार होता . मी स्वतः हा शॉट देताना खूप घाबरलो होतो कारण एवढासा तो मुलगा कोब्रा जवळ दाखवला जाणार होता. मुलाचे आई वडील दोघेही सेटवर हजर होते त्यावेळी मी त्यांना विचारलं की तो साप तुमच्या मुलाच्या इतक्या जवळ आहे तुम्ही त्याला घाबरत नाही का? त्यावर ते दोघेही म्हणाले होते की आम्हाला साप खूप प्रिय आहे, गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही वेगवेगळ्या सापांना हातात धरले आहे. साप आहे म्हणून मी घाबरत नव्हतो तर त्या मुलाला काही होऊ नये या काळजीत मी होतो त्यामुळे हा चित्रपट आणि त्यातला तो सिन माझ्या कायम लक्षात राहण्याजोगा आहे. आई कुठे काय करते या मालिकेतील नीलमची भूमिका साकारणारी अभिनेत्री शीतल क्षीरसागर हिने मला त्या मुलाबद्दल आठवण करून दिली.

अभिनेत्री शीतल क्षीरसागर म्हणाली हा तिच्याच कुटुंबाच्या खूप जवळचा मुलगा आहे आणि तिनेच त्या मुलाची आणि माझी भेट घडवुन आणली. तब्बल १४ वर्षांनी हा मुलगा रत्नागिरी हुन मला सेटवर भेटायला आला याचा मला खूप आनंद झाला आहे असे मिलिंद गवळी म्हणतात. या मुलाचे नाव आहे “समर्थ”. काल भैरव या चित्रपटावेळी समर्थ एक वर्षाचाही नव्हता. त्यावेळचा समर्थ आणि आताचा समर्थ असे दोन्ही फोटो मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर शेअर करून ही खास आठवण सांगितली आहे. आई कुठे काय करते मालिकेने आता वेगळे वळण घेतले आहे पण मालिकेला मिळालेलीच प्रसिद्धी पाहता मालिका आणखीन बरेच दिवस चालणार हे नक्की असो आई कुठे काय करते मालिकेसाठी अभिनेते मिलिंद गवळी याना खूप खूप शुभेच्छा…