Home Movies घेतला वसा टाकू नको मालिकेतील भगरे गुरुजींची मुलगी आहे हि प्रसिद्ध अभिनेत्री

घेतला वसा टाकू नको मालिकेतील भगरे गुरुजींची मुलगी आहे हि प्रसिद्ध अभिनेत्री

9968
0
angha bhagre pics
angha bhagre pics

झी मराठी वाहिनीवर “घेतला वसा टाकू नको” ही मालिका संध्याकाळी ६.३० वाजता प्रसारित केली जात आहे. पौराणिक कथांवर आधारित असलेल्या आपल्या सणांची माहिती मिळत असल्याने बहुतेक प्रेक्षकांना ही मालिका आवडली आहे. तशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया प्रेक्षक नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसतात. या मालिकेचे सूत्रसंचालन भगरे गुरुजी करत आहेत. याअगोदर झी मराठी वाहिनीच्याच “राम राम महाराष्ट्र” च्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षांपासून भगरे गुरुजी ‘वेध भविष्याचा’ या सेगमेंटमधून राशी भविष्य सांगताना दिसले त्यामुळे भगरे गुरुजी आजकाल सर्वांच्याच परिचयाचे बनले आहेत.

पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी हे त्यांचे पूर्ण नाव नाशिक, पंचवटी येथे त्यांचे स्वतःच्या नावे प्रतिष्ठान आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की पंडित भगरे गुरुजींची कन्या मराठी सृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा मालिकेतील श्वेता म्हणजेच अभिनेत्री ” अनघा अतुल भगरे” ही भगरे गुरुजींची कन्या आहे. अनघाची आई मोहिनी भगरे या शिक्षिका आहेत त्यामुळे लहानपणापासूनच अनघावर चांगले संस्कार होत गेले. रंग माझा वेगळा ही तिने अभिनित केलेली पहिलीच टीव्ही मालिका तर ‘अनन्या’ या गाजलेल्या नाटकातूनही ती रंगभूमीवर चमकली आहे. दिसायला अतिशय सुंदर असलेल्या अनघाने नाशिक येथुन शालेय शिक्षण घेतले त्यानंतर एसएनडीटी कॉलेज मुंबई येथून तिने मास कम्युनिकेशनची पदवी मिळवली. कुलकर्णी व्हर्सेस कुलकर्णी आणि व्हाट्सएप लग्न या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून तिने काम सांभाळले होते. याशिवाय काही काळ कोठारे व्हिजन मध्ये पीआर ब्रँड मॅनेजर पदाचा भारही तिने सांभाळला होता. कॅमेऱ्या मागे राहून काम करत असलेल्या अनघाला भविष्यात कॅमेऱ्यासमोर काम करावे लागेल याची कल्पना तिने केली नसावी. सुरुवातीला कॉलेजमधील नाटकांतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते त्यानंतर मुक्तीचमक, निरमा सारख्या व्यावसायिक जाहिरातीत ती झळकली. रंग माझा वेगळा या स्टार प्रवाह वरील मालिकेतून तिला श्वेताची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. प्रेक्षकांनाही तिच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केले. या मालिकेमुळे अनघा प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे. अभिनय क्षेत्रात मिळालेली ही संधी तिच्यासाठी फारच महत्वाची आहे आणि आता भगरे गुरुजींची कन्या म्हणूनही तिची नव्याने ओळख निर्माण होत आहे. अभिनेत्री अनघा भगरे हिला तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here