आज ७ ऑक्टोबर २०२१ रोजी चेन्नई सुपरकिंग आणि पंजाबच्या सामन्यात रोजी चेन्नई सुपरकिंगचा ६ विकेटने पराभव झाला. मात्र सामना चालू असताना एक असा प्रकार घडला कि त्यावर चेन्नई सुपरकिंगचे चाहते आणि चेन्नई सुपरकिंगची संपूर्ण टीम देखील खूप खुश झालेले पाहायला मिळाले. चेन्नई सुपरकिंगचा बॉलर दीपक चाहर याने सामना चालू असताना स्टेडिअममध्येच आपल्या प्रेयसीला फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोस केलं. त्याच्या प्रेयसीनेदेखील आपला होकार देत अंगठी घालून एकमेकांना घट्ट मिठी मारली.

हा सर्व प्रकार सामना चालू असताना घडला त्यामुळे दोन्ही टीम आणि तेथे असलेल्या प्रेक्षकांना हा क्षण आपल्या दोऱ्यांनी पाहायला मिळाला. इतकाच नाही तर हि सर्व घटना कॅमेऱ्यात कैद देखील करण्यात आली. टीव्ही पाहणाऱ्या प्रेक्षकांना देखील ह्या क्षणाचा आनंत लुटता आला. चेन्नई सुपरकिंगचा बॉलर दीपक चाहरच्या ह्या गर्लफ्रेंडचे नाव आहे “जया भारद्वाज”. जया भारद्वाज हि ऍक्टर आणि मॉडेल असलेल्या सिद्धार्थ भारद्वाज ह्याची सक्खी बहीण आहे. अनेक दिवसांपासून क्रिकेटर दीपक चाहर आणि त्याची गर्लफ्रेंड जया भारद्वाज एकमेकांसोबत पाहायला मिळाले. पण दोघानींनी एकमेकांना प्रपोस केलं नव्हतं. आज ७ ऑक्टोबर २०२१ रोजी चेन्नई सुपरकिंग आणि पंजाबच्या सामन्याचा औचित्य साधून चालू असलेल्या सामन्यातच दीपक चाहर ह्याने जया भारद्वाज हिला प्रपोस केलं. तेथे उपस्तित असलेल्या खेळाडूंची आणि प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दोघांचं कौतुक केलं. काही वर्षपूर्वी दीपक चाहर एका जाहिरातीच्या निमित्ताने जया भारद्वाज हिला भेटला आणि थेथेच दोघांची मैत्री झाली आणि आता मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं असं बोललं जातेय.