मित्रानो आज ४ ऑगस्ट मराठीतील दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर ह्यांचा जन्म दिवस आज ते ७७ वर्षांचे झाले. चौकट राजा सारखी मतिमंत व्यक्तिरेखा असो किंवा तात्या विंचू सारखी खतरनाक भूमिका असो इतकच काय तर हिंदीतील लगे रहो मुन्नाभाई मधील महात्मा गांधीजींची भूमिका असो ह्या अश्या कित्तेक विविधांगी भूमिका अगदी उत्कृष्ठ रित्या सदार करणारा हरहुन्नरी कलाकार दिलीप प्रभावळकर यांच्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.. रामरुईआ कॉलेज मधून केमिस्ट्री विषयातून दिलीप प्रभावळकर यांनी पदवी मिळवली. तर भाभा आटोमिक रिसर्च सेंटर मधून मास्टर्सची डिग्री देखील संपादन केली.

यानंतर दिलीप प्रभावळकर यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि मागे वळून न पाहता आज तागायत अनेक अजरामर अभिनय साकारून प्रेक्षकांची मने जिंकली. बोक्या सातबंडे, श्रीयुत गंगाधर टिपरे, चूक भूल द्यावी सारख्या अनेक मराठी मालिकाही त्यांनी उत्तमरीत्या साकारल्या. त्यांनी अनेक मराठी नाटके देखील केलीत पण त्यांनी केलेले वासूची सासू मधील स्री पात्र विशेष लक्षवेधी ठरले. मराठी चित्रपट झपाटलेला मध्ये साकारलेला तात्याविंचू आजही रसिक प्रेक्षक विसरू शकत नाहीत. दिलीप प्रभावळकर यांच्या पत्नीचे नाव नीला. नीला प्रभावळकर ह्या हाऊस वाइफ असून चित्रपट सृष्टीच्या झगमगाटापासून त्या चार हाथ लांबच राहणे पसंत करतात. सोशिअल मीडियावरही तुम्हाला त्यांचे फोटो पाहायला मिळणार नाहीत. बऱ्याच जणांना हे माहित नाही कि दिलीप प्रभावळकर केदार प्रभावळकर हा एकुलता एक मुलगा देखील आहे. पण मग तो मालिका किंवा चित्रपटात दिसत का नाही ह्याचे एक कारणही आहे.

अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा मुलगा केदार प्रभावळकर याना अभिनयाची मुळीच आवड नाही त्यामुळे ते अभिनयापासून थोडे दूरच राहिलेले पाहायला मिळतात. १७ डिसेंबर २०१३ रोजी केदारने सोनल अलवारससोबत मोठ्या थाटात लग्न केले. या लग्नाला अतुल परचुरेसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. केदार प्रभावळकर यांची पत्नी सोनल ही ख्रिश्चन असून महाराष्ट्रीयन पद्धतीने त्यांनी आपले लग्न केले. सोनल आणि केदार दोघेही इन्व्हायर्नमेंटल मॅनेजमेंट सेंटरशी निगडित आहेत. हे पर्यावरण प्रेमी दुर्गम भागात जाऊन जनजागृती घडवून आणण्यास प्रोत्साहन देतात. दिलीप प्रभाळकर यांचे हे संपूर्ण कुटुंब पुण्यात स्थायिक आहे परंतु कामानिमित्त दिलीप प्रभाळकर याना मुंबईला राहावे लागते आधींमधून ते पुण्याला त्यांच्या राहत्याघरी सुट्टीचा आनंद घेताना पाहायला मिळतात.