बिग बॉसच्या घरात एक स्ट्रॉंग कंटेस्टंट म्हणून अभिनेत्री स्नेहा वाघ हिच्याकडे पाहिले जाते त्यामुळे तिच्या चाहत्यांना ती बिग बॉसची विजेती बनणार अशी आशा आहे. नुकताच बिग बॉसच्या घरात स्नेहा वाघने तिच्या पहिल्या लग्नाबाबत खुलासा केला आहे. बिग बॉसचा कंटेस्टंट अविष्कार दारव्हेकर याच्यासोबत वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षीच तिने संसार थाटला होता. मात्र घरगुती हिंसाचारामुळे तिने अविष्कार पासून घटस्फोट घेतला होता. सुरेखा कुडची हिच्यासोबत बोलताना स्नेहाने अविष्कारच्या वाईट वागणुकीमुळे तिला किती त्रास झाला याबाबत उलगडा केला आहे.

स्नेहाने सुरेखा कुडची यांच्या सोबत बोलताना म्हणते की अविष्कार मला खूप मारायचा दुसऱ्या दिवशी सेटवर गेले की माझ्या चेहऱ्यावर मारलेल्या खुणा दिसायच्या त्यामुळे माझ्या सहकलाकाराना माझ्या बाबत पूर्ण कल्पना असायची. त्यामुळे सर्वजण मला सहकार्य करायचे मला समजून घ्यायचे. शिवाय शॉट देतानाही मला वेळ लागला तरी देखील ते सहकार्य करायचे. संध्याकाळी पुन्हा घरी जायच्या विचारानेच मला ताप यायचा. आता घरी गेल्यावर माझ्यासमोर काय वाढून ठेवलंय याचीच जास्त भीती असायची. एकदा तर अविष्कारने दिलेल्या त्रासामुळे मी अक्षरशः आई वडिलांच्या घरी पळून गेले होते. पण आता मी ती स्नेहा नाही आणि मी १७ वर्षांची देखील नाही. त्यामुळे मी आता ह्या गोष्टी आयुष्यातून बाजूला सारल्या आहेत. बिग बॉसच्या घरात त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला त्याचा खूप राग आला होता. सुरेखा कुडची जेव्हा स्नेहाचे हे बोलणे ऐकत होत्या तेव्हाच त्यांना देखील तिच्याबद्दल सहानुभूती वाटू लागली.

स्नेहा तू खूप सहन केलंस अशी एक प्रतिक्रिया त्यांनी स्नेहाला दिली. स्नेहा आणि अविष्कार हे दोघेही पूर्वाश्रमीचे पतिपत्नी आहेत मात्र बिग बॉसच्या घरात त्यांच्यात पुन्हा मैत्रीचे संबंध निर्माण व्हावेत अशी अपेक्षा प्रेक्षकवर्ग करत असला तरी हे शक्य होईल की नाही हे येत्या काही दिवसातच कळेल. तशा स्वरूपाचा प्रयत्न अविष्कार त्याच्या बाजूने करताना दिसत आहे. एकाकी वाटल्याने त्याने बिग बॉसच्या घरात स्नेहाला मिठी मारली होती त्यामुळे तो आता त्याचा हळवा कोपरा दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. स्पर्धकांच्या आयुष्यात काय काय घडलं हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून असते अश्या जुन्या स्टोरी पाहून मालिकेचा टीआरपी देखील चांगलाच वाढतो त्यामुळेच असे अनेक जुने किस्से उकरून प्रेक्षकांसोबत शेअर केल्या जातात. असो बिग बॉस सीजन ३ शो च्या स्पर्धकांना पुढील खेळासाठी खूप खूप शुभेच्छा..