अभिनेता आणि कविता करण्यात तितकाच लोकप्रिय असलेला प्रसिद्ध कलाकार संकर्षण कऱ्हाडेने नुकतीच आनंदाची बातमी दिली आहे. ३ दिवसापूर्वी म्हणजे २७ जुन २०२१ रोजी संकर्षणची पत्नी शलाका हिने जुळ्या मुलांना जन्म दिला असल्याचं त्याने सांगितलं आहे सोबत त्याने मुलांचा फोटो देखील शेअर केलं आहे. एक मुलगा आणि एक मुलगी असल्याचं त्याने सांगितलं आहे. ह्याच शिवाय त्याने त्या मुलांचं नाव देखील ठेवलं असल्याचं सांगितलं आहे. त्याच्या मुलाचं नाव सर्वज्ञ आणि मुलीचं नाव हे स्रग्वी ठेवण्यात आलं आहे.

संकर्षण कऱ्हाडे हा मराठीतील एक उत्तम अभिनेता आहे. अभिनय क्षेत्रात येण्यासाठी त्याने खूप धडपड केलीली पाहायला मिळते. महाराष्ट्राचा सुपरस्टार मधून त्याने आपल्या करियरची सुरवात केली होती. रामराम महाराष्ट्र, माझीया प्रियाला प्रीत कळेना, आभास हा, कानाला खडा , आम्ही सारे खवय्ये अश्या अनेक मालिकांत तो पाहायला मिळाला. तर खोपा ह्या चित्रपटातही त्याने अभिनय साकारला आहे. लोभ असावा, मी रेवती देशपांडे, तू म्हणशील तसं असे व्यावसायिक नाटक त्याने साकारले. संकर्षण कऱ्हाडे यांच्या पत्नीचे नाव आहे “शलाका पांडे कऱ्हाडे”. ती देखील एक उत्तम कलाकार आहे. कपड्यावर आणि कागदावर ती उत्तम चित्र काढतानाचे अनेक व्हिडिओ तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि शलाका पांडे कऱ्हाडे ह्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..