Home Entertainment अभिनेते अनंत जोग ह्यांची पत्नी देखील आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

अभिनेते अनंत जोग ह्यांची पत्नी देखील आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

12177
0
annat and ujwala jog
annat and ujwala jog

मराठी तसेच हिंदी मालिका आणि चित्रपटांत आपल्या दमदार अभिनयाने अनंत जोग यांनी प्रेक्षकांच्या मनात धास्ती भरवली. बऱ्याच चित्रपटात त्यांनी खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत पण काही मराठी मालिकांत त्यांनी हळव्या भूमिकाही साकारल्या आहेत. रावडी राठोड,नो एन्ट्री, शांघाय, दहेक, कच्ची सडक,सरकार, लाल सलाम, रिस्क, सिंघम या बॉलीवूड सिनेमातील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या तितक्याच लक्षात राहिल्या. चित्रपटसोबतच मराठी मालिकांत देखील त्यांनी विविध भूमिका बजावल्या.

anant jog daughter kshiti
anant jog daughter kshiti

अनंत जोग यांनीही एका मराठी अभिनेत्रीसोबतच विवाह केला. अनंत जोग यांच्या पत्नीचे नाव आहे उज्जवला जोग. उज्जवला जोग याही टीव्ही मालिका तसेच रंगभूमीवरील उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. कुंकू लावते माहेरचं, नवरा बायको, सौभाग्य कांकन या मालिके त्यांनी काम केले आहे. सूर्याची पिल्ले,ढोल ताशे,लुका छुपी या नाटकात त्यांनी काम केले आहे. अनंत आणि उज्जवला जोग यांना क्षिती नावाची मुलगी आहे. क्षिती देखील एक उत्तम अभिनेत्री आहे. तिची ‘दामिनी’ मालिकेतील इन्स्पेक्टर ची भूमिका विशेष गाजली होती. तू तिथे मी,गंध फुलांचा गेला सांगून या मालिकांत तिने काम केले आहे. घर की लक्ष्मी बेटिया,साराभाई vs साराभाई, ये रिशता क्या केहलता है या हिंदी मालिकेतही तीने उत्तम भूमिका साकारल्या आहेत. क्षिती जोग हिने २४ एप्रिल २०१२ साली हेमंत ढोमे सोबत तिने लग्न केले. हेमंत ढोमे हा मराठी चित्रपट सृष्टीतील उत्तम अभिनेता,लेखक आणि दिगदर्शक आहे. त्याने ‘बघतोस काय मुजरा कर’ या चित्रपटाचे लेखन तसेच दिग्दर्शनही केले आहे. क्षणभर विश्रांती, सतरंगी रे,पोस्टर गर्ल ,बस स्टॉप,आंधळी कोशिंबीर या चित्रपटात काम करुन प्रेक्षकांसमोर आपल्या अभिनयाची वेगळीच छाप पाडली आहे. “सातारचा सलमान” हा त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट. या चित्रपटाचे त्याने लेखनही केले आहे. प्रेक्षकांनीही ह्या चित्रपटाला विशेष पसंत दिर्शवलेली पाहायला मिळाली. जोग कुटुंबाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here