Home Actors लक्ष्मीकांत बेर्डे यांचा हा होता आवडीचा पदार्थ कितीही दिला तरी तो आवडीने...

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा हा होता आवडीचा पदार्थ कितीही दिला तरी तो आवडीने खायचा

1234
0
lakshmikant berde and nivedita saraf
lakshmikant berde and nivedita saraf

आजही लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट आपण न चुकता पाहतो. मराठीतला सुपरस्टार कलाकार मराठीच नाही तर हिंदी चित्रपटात देखील तितकाच लोकप्रिय ठरला. लक्ष्मीकांत बेर्डे आणि निवेदिता जोशी सराफ यांनी अनेक चित्रपट एकत्रित केले. खासकरून महेश कोठारे यांच्या चित्रपटात निवेदिता जोशी देखील सर्रास झळकायच्या. लक्ष्मीकांत बेर्डे आणि निवेदिता हे सेटवरच नाही तर खऱ्या आयुष्यात देखील एकमेकांचे चांगले मित्र होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांचं लग्न झालं तेंव्हा अनेक वर्ष निवेदिता लक्ष्मीकांत यांच्या घराजवळ राहायच्या. एकेदिवशी शुटिंगहून येताना जास्त उशीर झाला म्हणून त्या लक्ष्मीकांत यांच्या घरी राहिल्या उशीर होतो म्हणून त्यांनी आपल्या आईला मी लक्ष्याच्या घरी आहे हे कळविण्यासाठी फोन केला होता. समोरून आईने फोन उचलला आणि मी लक्ष्याच्या घरी आहे एवढं म्हंटल्या तोवर समोर एक भलंमोठं झुरळ त्यांना दिसलं आणि त्या जोरात ओरडल्या आणि फोन तसाच सोडून तिथून पळून गेल्या.

nivedita joshi saraf
nivedita joshi saraf

ह्यावर लक्ष्मीकांत हसत म्हणाला कि तू आईला म्हणाली मी लक्ष्मीकांतच्या घरी आहे आणि किंचाळलीस अन फोन देखील कट केला म्हणून निवेदिताला पुन्हा त्यांच्या आईला फोन करण्यासाठी सांगितले आणि तू झुरळ पाहिल्यावर ओरडलीस हे ही सांगायला लावले. हा गमतीशीर किस्सा नुतच निवेदिता सराफ यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. निवेदिता ह्यांना वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ घालायची भारी हौस. यामुळेच त्यांनी स्वतःचा यूट्यूब चायनल देखील बनवला जिथे त्या अनेक पदार्थ बनवताना पाहायला मिळतात. आपला मित्र लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण काढत त्याच्या आवडीची डिश त्यांनी नुकतीच प्रेक्षकांना बनवून दाखवली आहे. त्या म्हणतात कि सकाळच्या नाश्त्याला, दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात कधीही तो हि डिश आवडीने खायचा. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आवडता पदार्थ म्हणजे “खोबऱ्यातली सुरमई”. खोबऱ्यातली सुरमई खाण्यासाठी लक्ष्मीकांत कधीही कोठेही जायला एका पायावर तयार असायचं हि डिश म्हणजे त्याचा जीव कि प्राण. सोशल मीडियावर हा किस्सा तुफान व्हायरल झालेला पाहायला मिळतो. लक्ष्याच्या प्रत्येक आठवणी त्याच्या आवडी निवडी आजही लोक कुतूहलाने पाहताना दिसतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here