Home Actors 20 वर्षे झाली आपल्या परिचयाला… राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीची खास पोस्ट

20 वर्षे झाली आपल्या परिचयाला… राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीची खास पोस्ट

712
0
tejaswini pandit and raj thakre
tejaswini pandit and raj thakre

‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख माननीय राजसाहेब ठाकरे’ यांचा 14 जून म्हणजे कालच वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक व्यक्तींनी त्यांना प्रकट दिनाच्या शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केलं. अशातच अनेक कलाकार मंडळींचं राज साहेबांशी असलेलं घट्ट नातं आपण बऱ्याचदा पाहत किंवा एकत असतो. दरम्यान मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री ‘तेजस्विनी पंडित’ हिने एक खास पोस्ट शेअर करत राज ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तेजस्विनी पंडित हिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरे आणि तेजस्विनी एकमेकांच्या बाजूला बसले आहेत. सोबतच ते दोघं खळखळून हसत आहेत . याचा अर्थ असा की त्या दोघांमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या आहेत. तेजस्विनीच्या या पोस्टला पन्नास हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.

tejaswini pandit sister with mother
tejaswini pandit sister with mother

त्याचबरोबर तिच्या या पोस्टला अनेक चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत आणि राज साहेबांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. फोटो शेअर करत तेजस्विनीने कॅप्शनमध्ये असं लिहिलं आहे की,” आदरणीय राजसाहेब ठाकरे, 20 वर्षे झाली आपल्या परिचयाला! तुमचं खूप कौतुक वाटतं मला… इतकं परिपूर्ण व्यक्तिमत्व… राजकारण, संगीत, कला, क्रीडा, इतिहास, कॉमन सेन्स आणि मुख्य म्हणजे सार्वभौम why ahead of time Vision असलेला एकमेव नेता! स्वतःच्या हिमतीवर एवढा मोठा डोलारा उभा केला, तो वाढवलात, वृद्धिंगत केलात… इतकी वर्ष पर्वतासारखे जगलात, अनेक संकट आली पण कुटुंबप्रमुख म्हणून एवढी कुटुंब जपलीत, स्वतःचा विचार डगमगू दिला नाहीत, लाचारी पत्करली नाहीत… राजकारणात मैत्री आणली नाही, आणि मैत्रीत राजकारण केलं नाही. so called fast life मध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यात ठेहराव आणलात आणि आमच्या मनात आढळत स्थान निर्माण केलंत! हा never give up attitude इतका ठासून कसा हो भरलाय तुमच्यात?

tejaswini pandit with raj thakrey
tejaswini pandit with raj thakrey

राजकारणातल्या एवढ्या अवघड आणि प्रतिकूल प्रवासात अनेकजण तलवारी टाकून देतात, काही ढाल धरून उभे राहतात पण तुम्ही बेदरकारपणे तुमची मत मांडत गेलात आणि ते आजही चालूच आहे… कारण कर नाही त्याला डर कशाला! मुख्य म्हणजे तुमच्या जाणीवा अजूनही जिवंत आहेत! तुमच्या वाढदिवसानिमित्त एवढं मात्र नक्की म्हणावसं वाटतं ” राज ठाकरे यांची महाराष्ट्रात सत्ता नाही हे राज ठाकरेंचं नाही तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे!” तुमच्यासारख्या माणसांचा साचा आता देव बनवत नाही आणि अशा अनोख्या माणसाला जवळून अनुभवण्याचं सुदैव मला लाभलं यासाठी मी स्वामींची आभारी आहे. देव तुम्हाला दीर्घ आयु देवो आणि वाढदिवसा व्यतिरिक्त शुभेच्छांचा आणि प्रेमाचा पाऊस सदैव तुमच्यावर बरसत राहो. कोटी कोटी शुभेच्छा आणि प्रेम राजसाहेब”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here