अभिनेता योगेश सोहनी ह्यच्याबाबद काही दिवसांपूर्वी एक्सप्रेस व्हेवर ५० हजारांचा गंडा घातलेली माहिती त्याने शेअर केलेली तुम्हाला माहीतच असेल. सुदैवाने पोलिसांनी तातडीने कारवाई केल्याने त्याला त्याचे पैसे परत मिळाली होते. पण आता आणखीन एक नवीन घटना उघडकीस आली आहे. मुलगी झाली हो याच मालिकेतील एका अभिनेत्री बाबद आणखीन एक घटना घडली आहे. सविता मालपेकर असं त्या अभिनेतीच नाव आहे.अभिनेता योगेश सोहनी आणि अभिनेत्री सविता मालपेकर हे दोघेही एकाच मालिकेतील कलाकार आहेत…

१९ जुलै रोजी सोमवारी संध्याकाळी ७.३० वाजताच्या सुमारास सविता मालपेकर या नित्यनियमाने शिवाजीपार्कला चालायला जातानाची हि घटना आहे. शिवाजी पार्कवर तीन राउंड चालून आल्यावर एका झाडा शेजारील काट्यावर त्या बसल्या होत्या. मुंबई त्यावेळी रिमझिम पाऊस पडत असल्याने त्यादिवशी चालायला येणार्यांची गर्दी तशी कमीच होती. तोंडाला रुमाल बांधलेला एक इसम त्यांच्याजवळ येऊन किती वाजलेत असं विचारू लागला. अभिनेत्री सविता मालपेकर ह्यांच्याकडे घड्याळ नाही असं त्यांनी सांगितल्यावर ती व्यक्ती तेथून बाजूला गेली पण थोड्या वेळातच ती त्यांच्या मागे येऊन त्याने गळ्यातील चैन जोरात ओढायला सुरवात केली. चोराने चैन चोरून बाजूला उभ्या असलेल्या बाईकवर बसून तेथून पळ काढला. आजूबाजूला काही युवक होते त्यांनी त्याचा पाठलाग केला पण चोर फारच लांब निघून गेला होता. सगळं काही इतकं पटकन घडलं कि कोणाला काय झालय हे लवकर समजलंच नाही. अभिनेत्रीने तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तेथे काही सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत त्यातून त्या चोराला पकडण्यात पोलिसांना यश येईल ह्यात शंका नाही. पण वयोवृद्ध महिलांना अश्याप्रकारे गळ्यातील ऐवज पळवताना त्याच्या मानेवर किंवा शरीवर इजा देखील होऊ शकते त्याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी असं त्यांचं मत आहे.