आपल्या भारतातील मराठी कलाकारांनी आत्तापर्यंत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम करून स्वतःचा ठसा उमटवला आहे. अशातच गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत राहिलेला ‘आदीपुरूष’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये कीर्ती सेनन आणि प्रभास उप्पलपती हे दोन कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. त्याचबरोबर आपल्या मराठी सिनेविश्वातील गाजलेल्या कलाकारांनी देखील आदीपुरुष या चित्रपटामध्ये काम केले असुन सर्वत्र त्यांची चर्चा असल्याचं पाहायला मिळतयं. या चित्रपटात देवदत्त नागे यांनी बजरंगबली हनुमानाची भूमिका साकारली आहे. मराठी चित्रपटसृष्टीची गुलाबाची कळी म्हणजेच ‘तेजस्विनी पंडित’. तेजस्विनी पंडित हिने आतापर्यंत अनेक नाटकांमधून आणि चित्रपटांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता तेजस्विनी आदीपुरुष या चित्रपटामध्ये झळकली असून, तेजस्विनि ‘शुर्पणखेच्या’ भूमिकेत दिसणार आहे.
सोबतच ‘सावरखेड एक गाव’ या मराठी चित्रपटातील ‘सोनाली खरे’ ही आपल्याला ‘कैकेयीच्या’ भूमिकेत दिसली आहे. सोबतच ‘अभिनय बेर्डे’ याने देखील आदीपुरूष या चित्रपटामध्ये काम केले आहे. आपल्या या मराठी कलाकारांना बॉलीवूड चित्रपटात अभिनय करताना पाहून चहात्यांना त्यांचं कौतुक वाटत आहे. आदीपुरुष या चित्रपटामध्ये प्रभास उप्पलपती यांनी प्रभू श्रीरामाची भूमिका साकारली असून, कीर्ती सेनन ही आपल्याला सीतेच्या भूमिकेत दिसली आहे. या चित्रपटामध्ये प्रभू श्रीरामाचा संपूर्ण इतिहास दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘ओम राऊत’ यांनी केले असून, भूषण कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.