अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीच पती राज कुंद्रा ह्याच्या अश्लील चित्रफीत प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येताना पाहायला मिळत आहेत. नुकतंच अभिनेत्री शिल्पा शेट्टीने ह्यावर खुलासा करत आम्ही कोणतंही गैर कृत्य न केल्याचं सांगितलं आहे. पण तरी देखील रोज नवनवे खुलासे केल्याने राज कुंद्रा ह्यांच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हीच देखील नाव समोर आलं होत पण त्यात तिचा काहीही संबंध नव्हता असा खुलासा तिने केला होता. पण आता एका मराठी अभिनेत्रीनेच मला फिल्मसाठीऑफर दिली होती असं सांगितलं आहे.

त्या मराठी अभिनेत्रीच नाव आहे “मनीषा केळकर”. मराठी अभिनेत्री मनीषा केळकर हिने एका मुलाखतीत ह्याचा उलगडा केला आहे. ती म्हणते “राज कुंद्रा ह्यांच्या प्रोडक्शन हाऊस मधून मला फोन आला होता आम्ही एक नवीन ऍप लाँच करणार आहोत त्यासाठी आम्ही तुम्हाला हा फोन केला आहे. राज कुंद्रा प्रोडक्शन हाऊस हे खूप मोठं नाव असल्याने सुरवातीला तिला आनंद झाला पण नक्की काय रोल आहे असं विचारल्यावर त्यांनाच नीट सांगता येत नसल्याचं तिने सांगितलं. हि फिल्म आणि ऍप नेमकं काय आहे ह्याची कल्पनाही तिला दिली गेली नाही त्यामुळे काहीतरी विचित्र असल्याचं तिला जाणवलं आणि तिने त्यांना नकार कळवला. आता राज कुंद्रा ह्यांचं हे प्रकरण खूपच तापलं असल्याने अनेक अभिनेत्री समोर येऊन त्यासंदर्भातील खुलासा करताना पाहायला मिळेत आहेत. राज कुंद्रा हा नवीन “बॉलीफिल्म” अॅप लाँच करण्याच्या तयारीत होता ह्यामध्ये तो चॅट शो सोबत रिअॅलिटी शो, म्युझिक व्हिडीओ तसेच पिक्चर फिल्म्सचा समावेश करणार होता. असं अभिनेत्री गहना वशिष्ठने खुलासा केला होता पण आता हे प्रकरण वेगळच वळण घेताना पाहायला मिळत आहे.