आज 18 जून म्हणजेच ‘जागतिक वडील दिवस’. हा दिवस खास आपल्या वडिलांसाठी असतो. अनेक व्यक्ती आपल्या वडिलांना ‘वडील दिनाच्या’ शुभेच्छा देत इंस्टाग्राम स्टोरीज, व्हाट्सअप स्टेटस ठेवत आहेत. दरम्यान अशा गोष्टींसाठी कलाकार अपवाद नाहीत. मराठी सिनेसृष्टीमधील हरहुन्नरी अभिनेत्री ‘मानसी नाईक’ हीने आज इंस्टाग्रामवर वडिलांसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. मानसीने शेअर केलेला पोस्टमध्ये ती आणि तिचे वडील सोबत उभे आहेत. पोस्टमध्ये दाखवल्याप्रमाणे मानसी आणि तिचे वडिल एखाद्या श्रद्धास्थानी असल्याचे दिसत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या मागे लाडूंचे भरपुर बॉक्स दिसत आहेत. सोबतच मानसीच्या वडिलांनी हातामध्ये भलामोठा फुलांचा हार घेतला आहे. वडील दिनानिमित्त ही पोस्ट शेअर करत मानसीने असे कॅप्शन लिहिले आहे की,” कसं जगायचं आणि कसं वागायचं हे तुम्ही शिकवलंत आणि त्यामुळेच या जगात जगायला शिकलोय हॅपी फादर्स डे बाबा”. असं म्हणत मानसीने वडील दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पुढे मानसीने असही लिहिलं आहे की,” काळजी करू नका… मी तुमची मुलगी आहे, मी हार मानणार नाही. ‘तीन बायका फजिती ऐका’ या चित्रपटामधील मानसीच्या ‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’ या गाण्याने प्रेक्षकांना वेड लावून ठेवलं होतं. तिचा त्या गाण्यामधील मादक अंदाज पाहून अनेक तरुणांना भुरळ पडली होती. त्यानंतर मानसी आपल्याला ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यामध्ये पाहायला मिळाली. तिचं हे गाणं सुद्धा प्रचंड गाजलं असून, 2010 साली तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होत. सोबतच मानसी सोशल मीडियावर कायम सक्रिय राहण्याचा प्रयत्न करते. ती दररोज तिच्या वेगवेगळ्या अंदाजातील व्हिडिओ पोस्ट करून चहात्यांचं मनोरंजन करत असते.