Home Entertainment गोलमाल चित्रपट अभिनेत्याचे दुःखद निधन… वागळे की दुनिया, जिना मरना तेरे संग,...

गोलमाल चित्रपट अभिनेत्याचे दुःखद निधन… वागळे की दुनिया, जिना मरना तेरे संग, सत्ते पे सत्ता, जाण से प्यारा अशा अनेक

2073
0
harish magal actor no more
harish magal actor no more

मागील काही दिवसांपासून मोठमोठे नामवंत कलाकारांच्या निधनाच्या बातमीने प्रेक्षकांना धक्के बसत आहेत. अशातच आता गोल माल, नमक हलाल यासह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारे ज्येष्ठ अभिनेते हरीश मागोन यांचे १ जुलै २०२३ रोजी निधन झाले असल्याचे समोर आले आहे. हरीश मागोन हे ७६ वर्षांचे होते. वागळे की दुनिया, जिना मरना तेरे संग, सत्ते पे सत्ता, जाण से प्यारा , मशाल, खुशबू, जनम से पहले, कलयुग के अवतार अशा चित्रपटातून त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका साकारलेल्या होत्या. सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन (CINTAA) ने ट्विटरवर ही बातमी शेअर केली आहे आणि भावुक होत लिहिले आहे की , ” हरीश मागोन हे जून १९८८ पासून CINTAA चे सदस्य होते त्यांच्या निधनाबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो.” हरीश मागोन हे एफटीआयआयचे माजी विद्यार्थी होते आणि त्यांनी चुपके चुपके, मुकद्दर का सिकंदर तसेच शहेनशाह यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले होते.

harish magal actor
harish magal actor

त्याची शेवटची ऑनस्क्रीन भूमिका १९९७ मध्ये आलेल्या Uff! ये मोहब्बत यामध्ये होती. अभिनेता असण्यासोबतच त्यांची मुंबईतील जुहू येथे एक अभिनय कार्यशाळा देखील होती. या कार्यशाळेतून त्यांनी अनेक कलाकारांचं भविष्य घडवलं आहे. हरीश यांच्या निधनावर चित्रपट समीक्षक आणि दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे. पवन झा यांनी ट्विटरवर हरीश मागोन यांच्या निधनावर शोक व्यक्त करत लिहिले आहे की, “ आठवणीतला हरीश मागोन, हिंदी चित्रपटसृष्टीतील त्या गोंडस कॅमिओसाठी नेहमीच लक्षात राहतील. FTII मधून पदवीधर असलेला, तो गुलजारचा सहाय्यक मेराजचा जवळचा मित्र होता आणि म्हणूनच इथे आंधी गाण्यात ब्रेकसाठी कॅमेऱ्याला त्याला सामोरे जावे लागले.” पुढे ते म्हणतात की, “हरीश मागोनचा आणखी एक गोंडस छोटासा प्रयत्न गुलजारच्या खुशबूमध्ये होता, शर्मिला इंट्रो सीनमध्ये होती, जितेंद्र आणि हरीशचा एक संस्मरणीय संवाद ‘यार ये भूत इतने बहुत अच्छे होते हैं, मुझे नहीं मालूम था.’ तरीही सर्वात संस्मरणीय कलाकृतींपैकी एक. हरीश मागोनसाठी हृषी दाचा गोलमाल हा छोट्या भूमिकेच्या सीनसाठी होता, सुनिल गावस्करचा वर्गमित्र आणि ब्लॅक पर्लचा चाहता म्हणून तो तिथे झळकला होता. अशा प्रकारे सिल्व्हर स्क्रीनवरील एक छोटासा कलाकार तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या पलीकडे घेऊन जाऊ शकतो अशी त्याची कारकीर्द होती.” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here