बिग बॉस सीझन 3 मध्ये सकाळी उठून बिग बॉसच्या कॅमेरासमोर सरांगे बिग बॉस असं म्हणत स्नेहा वाघने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. सध्या स्नेहा वाघ आणि आपल्या सगळ्यांची लाडकी मायरा वैकुळ या दोघींचे बंगाली लूकमधील फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहेत. सोबतच त्या दोघी एका सिरीयलच्या शूटिंग सेटवर असल्याच्या पाहायला मिळतात. नेमका काय आहे हा फंडा जाणून घेऊया. अभिनेत्री स्नेहा वाघ आणि मायरा वैकुळ या दोघी लवकरच आपल्याला कलर्स टीव्हीवरील ‘नीरजा एक नही पहचान’ या हिंदी मालिकेमध्ये दिसणार आहेत. ही मालिका 10 जुलै रात्री 8:30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्नेहा आणि मायराचे चाहते त्यांच्या या नव्या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. या मालिकेमध्ये त्या दोघी बंगाली वेशभूषेत असल्याच्या दिसतायत. सोबतच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे मायरा आपल्याला नीरजाच्या भूमिकेत दिसणार आहे आणि स्नेहा वाघ ही प्रतिमा हे पात्र साकारणार असल्याचं पाहायला मिळत आहे. सोबतच या दोघी मयलेकी असल्याच्या दिसतायत. प्रोमोमध्ये नीरजा दारामध्ये उभी राहून नवरीची डोली जाताना पाहते. त्यानंतर घरामध्ये येऊन ती लाल रंगाची ओढणी डोक्यावर घेऊन म्हणते की,” प्रतिमा मुझे भी दुल्हन बना है, प्यारी लगुंगी ना मैं, दुल्हन…”. असं म्हणत नीरजा पूर्ण घरभर फिरते. अशातच घरामध्ये बाकड्यावर दोन बायका बसलेल्या असतात. त्यातील एक म्हणते की,” मासूम है, दुल्हन तो ये बनेगी परंतु किसी एक की नहीं पुरे सोनाराज्य की”. त्यानंतर प्रतिमा म्हणते,” मेरी मजबूरी,”मेरे बेटी की हकीकत नही बनेगी”. प्रोमो पाहून अनेकजण मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या दोघींचं सोशल मीडियावर अनेक चाहते कौतुक करत आहेत.