अनेक कलाकार आपला अभिनय सांभाळत एखादा दुसरा व्यवसाय देखील करताना पाहायला मिळतात. अभिनेता शशांक केतकरने देखील अभिनय सांभाळत पुण्यात कोथरूड परिसरात आपलं “आईच्या गावात” नावानं हॉटेल सुरु केलं होत. परंतु २०१९ साली काही कारणास्तव शशांकने हे हॉटेल बंद करत असल्याचे जाहीर केले होते. शशांक हॉटेल बंद करतोय असे म्हटल्यावर त्याच्या चाहत्यांनी हॉटेल बंद करू नकोस अशा सूचना दिल्या होत्या. पण आपल्याला आता ते हॉटेल चालवणे शक्य नसल्याने त्याने ते विकायला काढलं असल्याचं त्याने नमूद केलं होत.

अभिनेता शशांक केतकरची पत्नी प्रियांका हिने वकिलीचे शिक्षण घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच शशांक आणि प्रियांका ह्यांना पुत्र प्राप्ती झाली असल्याची बातमी शशांकने चाहत्यांसोबत शेअर केली होती. शशांकने आपल्या मुलाचं नाव ‘ऋग्वेद’ असं ठेवलय. शशांक अभिनय व्यतिरिक्त स्वतःच युट्युब चायनल देखील चालवतो आहे. तर पत्नी प्रियांका देखील आता एका नव्या व्यवसायात उतरली आहे. दोन दिवसांपूर्वी नुकताच नवा व्यवसाय सुरू करत असल्याचे तिने सोशल मीडियावरून कळवले होते. “Rainbow Twinkles” या नावाने तिने स्वतःचे आर्टस् अँड क्राफ्टस स्टोअर सुरू केले आहे. ह्या व्यवसायाचे काही फोटो देखील त्यांनी आपल्या ऑफिसिअल अकाउंटवर शेअर करत आमच्या या नव्या व्यवसायाला तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छांची गरज असल्याचे म्हटले आहे. अभिनेता शशांक केतकर आणि प्रियांका ह्यांना रेनबो ट्विनकल्स या नव्याने सुरू केलेल्या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा…