आज वयाच्या ८१ व्या वर्षी श्री गुरू बालाजी तांबे यांचे निधन झाले आहे. योग, संगीतोपचार आणि आयुर्वेद या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी समाजाचे परिवर्तन घडवून आणण्याचे काम केले होते. प्रकृती खालावल्याने गेल्या आठवड्यात त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज मंगळवारी उपचार घेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली आहे. आज मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या मागे पत्नी वीणा ,सुनील आणि संजय ही दोन मुलं सून आणि नातवंड असा परिवार आहे.

लोणावळा जवळील कार्ला येथे ‘ आत्मसंतुलन व्हिलेज’ हे आश्रम उभारले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी आयर्वेदाबद्दल जनजागृती घडवून आणण्याचे काम केले होते. त्यांच्या या आश्रमाला संगीत, कला, राजकीय, साहित्य अशा सर्वच स्तरातील व्यक्तींनी भेटी दिलेल्या आहेत. ‘गर्भसंस्कार’ या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी पुढच्या पिढीना मार्गदर्शन देण्याचे काम केले आहे. तब्बल सहा भाषांमध्ये लिहिलेल्या या पुस्तकाला मोठ्या प्रमाणात मागणी होती आणि आजही आहे. वृत्तपत्र लेखातून त्यांनी आजवर आरोग्यविषयी अनेक मार्गदर्शनपर लेख लिहिले आहेत. त्यांनी शास्त्रशुद्ध आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने आयुर्वेदिक औषधे निर्माण केली आहेत. या औषधांना देखील मोठी मागणी असते. आयुर्वेदाचा प्रसार केवळ महाराष्ट्र आणि देशापुरता मर्यादित न ठेवता तो जगभर कसा अवलंबला जाईल याकडे त्यांनी प्रामुख्याने लक्ष दिले होते. यातून आयुर्वेदाबद्दल परदेशी नागरिकांनाही जागरूक केले. टीव्ही मधतामातूनही अनेकदा त्यांना मुलाखतीसाठी आमंत्रित केले होते.श्री तांबे यांनी जगभर ख्याती निर्माण केली होती.