Home Entertainment अक्षयचा तो बोर्ड पाहून लोकांनी फिल्म्स कंपनीत गुंतवले पैसे आणि रिलीज पूर्वीच...

अक्षयचा तो बोर्ड पाहून लोकांनी फिल्म्स कंपनीत गुंतवले पैसे आणि रिलीज पूर्वीच झाले मालामाल

1717
0
belbottom film look
belbottom film look

खिलाडीयों का खिलाडी म्हणून अक्षय कुमारला ओळखलं जात. ह्या महामारीच्या काळात अनेक चित्रपटांचं शूटिंग थांबलं इतकंच काय तर शूटिंग पूर्ण झालेले चित्रपट देखील प्रेक्षक पाहणार नाहीत ह्या भीतीनं लांबणीवर गेले. पण ह्या सर्वाना बाजूला सारत अक्षयचा लक्ष्मी बॉम्ब चित्रपटातने धुमाकूळ घातला. थिएटर बंद असूनही चित्रपटाने चांगली कमाई करून दाखवली. आता अक्षयचा आणखीन एक चित्रपट येत्या १९ ऑगस्ट २०२१ ला रिलीज होतोय ह्या चित्रपटाचा बॅनर त्याने माच्या वर्षीच प्रकाशित केला होता. चित्रपटाचं नाव आहे “बेलबॉटम”. ह्या बोर्ड मध्ये एका चित्रपट कंपनीचं नाव आहे ती कंपनी म्हणजे “पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स “.

belbottom film actors
belbottom film actors

इंव्हेस्टर्स नेहमी पुढचा विचार करतात. ह्या फिल्मचा तो बोर्ड पाहून अनेकांनी हि कंपनी काय आहे ह्याची इंटर्नवर चौकशी केली. पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स हि फिल्म कंपनी मुंबई स्टॉक एक्सचेंजला लिस्ट झालेली आहे. हा शेअर त्यावेळी फक्त १४ रुपयांना मिळत होता. अनेकांनी अक्षयच्या हातातील तो बोर्ड पाहून ह्या शेअरमध्ये गुंतवणूक करायला सुरवात केली. आज जवळपास १ वर्षांनी त्या कंपनीच्या शेअर्सची किंमत हि १४ रुपयांवरून तब्बल ३१२ रुपयांवर गेली आहे. म्हणजेच ह्या कंपनीमध्ये जर कोणी १ लाख रुपये त्यावेळी लावले असतील तर त्याचे जवळपास २२ लाख रुपये झाले असते. इतकंच काय तर २०१५ साली ह्या शेअरची किंमत फक्त ३ रुपये १५ पैसे होती आणि आज ३१२ रुपये म्हणजेच फक्त ६ वर्षात ह्या कंपनीत इन्व्हेस्टरचे १ लाखाचे तब्बल १ कोटींहून अधिक रुपये झालेले आहेत. बेलबॉटम चित्रपटाचं गेल्या महिन्यात रिलीजची तारीख प्रकाशित करण्यात आली आणि ह्या शेअर्सला उप्पर सर्कीट लागत गेला. हा चित्रपट ह्या वर्षीचा सर्वात चांगला चित्रपट असल्याचं देखील बोललं जातंय.

ganpath and karn film
ganpath and karn film

इतकंच नाही ह्या चित्रपट कंपनीचा पुढील वर्षी “गणपत”हा चित्रपट देकील प्रकाशित होणार आहे. टायगर श्रॉफ आणि क्रिती सॅनॉन ह्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. गणपत चित्रपटा पाठोपाठ २०२३ साली म्हणजे आणखीन २ वर्षांनी ह्याच चित्रपट कंपनीचा आणखीन एक चित्रपट प्रकाशित केला जाण्याची चर्चा आहे आणि ह्या चित्रपटाचं बजेच हे तब्बल ३०० कोटींहून अधिक असणार आहे. ह्या चित्रपटाचं नाव असणार आहे “कर्ण”. बाहुबली चित्रपटापेक्षाही जास्त पैसे ह्या चित्रपटावर खर्च होणार असल्याचा बोललं जातंय. चित्रपटाचं शूटिंग ह्या महामारीमुळे लांबणीवर गेलं आहे. चित्रपटातील प्रमुख भूमिकेत कोण असणार हे देखील अजून स्पष्ठ झालेलं नाही. पण पहिल्याच टीजरमध्ये लाखो हिट च्या चित्रपटाला मिळाले आहेत. हे सर्व पाहता ह्या कंपनीत इन्व्हेस्टरची आणखीन चांदी होणार हे नक्की. तूर्तास अक्षयच्या “बेलबॉटम” चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here