Home Entertainment या वयात देखील आदेश बांदेकर आणि ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने परीक्षा देऊन...

या वयात देखील आदेश बांदेकर आणि ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने परीक्षा देऊन झाले पास

6305
0
aadesh and madhura
aadesh and madhura

काही दिवसांपूर्वीच मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल ( दूर व मुक्तविद्यापीठ) या संस्थेच्या एम ए भाग १ आणि एमए भाग २ या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला होता. या परीक्षा ऑनलाईनद्वारे जून २०२१ मध्ये घेण्यात आल्या होत्या. दरवर्षी आयडॉलच्या होणाऱ्या परीक्षेत कलाकार, राजकीय, खेळाडू आणि प्रशासकीय व्यक्ती या परीक्षा देत असतात. ज्यांना काही कारणास्तव आपले पुढील शिक्षण घेता येत नाही ते या संस्थेतून पदवी प्राप्त करू शकतात. यावर्षी संस्थेच्या एमएच्या प्रथम वर्षाचा निकाल ८६.२२% लागला असून द्वितीय वर्षाच्या एमएचा निकाल हा ८३.०२% इतका लागला आहे.

aadesh bandekar and madhura velankar
aadesh bandekar and madhura velankar

विशेष बाब म्हणजे वयाच्या ६४ व्या वर्षी वसईचे माजी आमदार ‘विवेक पंडित’ हे एमए भाग २ च्या परीक्षेत राज्यशास्त्र विषयात ९४% गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. तर मराठी सृष्टीतील अभिनेते, सूत्रसंचालक आणि सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी एमए प्रथम वर्षाच्या परीक्षेत राज्यशास्त्र विषयात ८८.५% इतके गुण मिळवले आहेत. आदेश बांदेकर प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने त्यांचे कौतुक देखील होत आहे. आदेश बांदेकर यांच्यासह मराठी सृष्टीतील आणखी एक अभिनेत्री एमएच्या परीक्षेत उत्तम गुणांनी पास झाली आहे. ही अभिनेत्री आहे मधुरा वेलणकर साटम . मधुरा वेलणकर हिने एमए प्रथम वर्षाच्या परीक्षेत मराठी विषयात ८२% गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. वयाच्या ३९ व्या वर्षी मधुरा वेलणकर एमए प्रथम वर्षाची परीक्षा उत्तम गुणांनी पास झाल्याने तिचेही कौतुक केले जात आहे. मराठी चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात व्यस्त असल्याने मधुराला पुढील शिक्षण पूर्ण करणे जमले नव्हते. आता कामातून आणि चित्रीकरणातून अभ्यासाला वेळ मिळाला आणि पुढील पदवी मिळावी या हेतूने आयडॉल संस्थेतून एमएची परीक्षा दयायचे ठरवले. मराठी भाषेची आवड पहिल्यापासूनच होती शिवाय मराठी भाषेतील तिची काही पुस्तकही प्रसिद्ध आहेत. सध्या मधुरा एमएच्या प्रथम वर्षाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. आदेश बांदेकर, मधुरा वेलणकर, विवेक पंडित, केतन वैद्य यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असल्याने ह्या व्यक्ती इतरांसाठी प्रेरणादायक ठरत असल्याचे आयडॉल संस्थेचे संचालक डॉ प्रकाश महानवर यांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here