Home Movies क्या मस्ती क्या धूम या रिऍलिटी शोची विनर बनलेली ही मुलगी ...

क्या मस्ती क्या धूम या रिऍलिटी शोची विनर बनलेली ही मुलगी मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री

2588
0
kya masti kya dhoom prajakta mali
kya masti kya dhoom prajakta mali

आजवर अनेक रिऍलिटी शो च्या माध्यमातून नवख्या कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते. पुढे जाऊन हेच कलाकार प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेले पाहायला मिळतील याची कल्पनाही त्यावेळी त्यांनी स्वतः केली नसावी. अशाच एका रिऍलिटी शोमधून आपल्या नृत्याची अदाकारी सादर करून प्रेक्षक आणि परीक्षकांची वाहवा मिळवलेली फोटोतील ही मुलगी आज मराठी सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री. क्या मस्ती क्या धूम या रिऍलिटी शोची विनर बनलेली ही मुलगी आहे अभिनेत्री “प्राजक्ता माळी”.

actress prajakta mali

खो खो, हम्पी अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटासोबतच एका पेक्षा एक, जुळून येती रेशीमगाठी, नकटीच्या लग्नाला यायचं हं,मस्त महाराष्ट्र, महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिका आणि रिऍलिटी शोमधून प्राजक्ताने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. नुकतेच प्राजक्ताने थ्रोबॅक म्हणत स्वतः सहभागी झालेल्या स्टार प्लस वरील एका रियालिटी शो ची आठवण करून दिली. अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने ह्या शोचे सूत्रसंचालन केले होते तर अभिनेता डीनो मोरिया स्पेशल गेस्ट म्हणून तिथे हजर होता. २००१ साली हा शो स्टार प्लस वाहिनीवर प्रसारित केला जात होता. वयाच्या १४ व्या वर्षी प्राजक्ताने या शोमध्ये सहभाग दर्शवला आणि त्याचे विजेतेपद देखील पटकावले, ही आठवण काढून त्या शोचा एक व्हिडिओ तीने सोशल मीडियावर शेअर केला आणि सांगितले की, (Sorry for the bad audio)I was deleting the stuff and see what I have got Meet my young version (age 14 I guess), who won “Kya mast Kaya dhoom” competition of Star Plus. Choreographed by- yourstruly Costumes by- Aai..(मी पण मराठी मुलगी आहे हे कळल्यावर, माझं नृत्य झाल्यानंतर मी दमलेय हे दिसल्यावर; सोनालीनं मला एक chocolate दिलं होतं ) प्राजक्ता माळी हिंदी रिऍलिटी शोची विजेती आहे म्हटल्यावर तिच्या चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here