मराठी बिग बॉसचा चौथा सिजन लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. शोचे आता अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने बिग बॉसच्या ह्या आठवड्यात फॅमिली विक पाहायला मिळाला. त्यामुळे प्रेक्षकांना सदस्यांच्या कुटुंबियांना जाणून घेण्याची संधी मिळाली. त्यात विशेष म्हणजे किरण माने यांच्या लेकीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलेली दिसली. तर आरोहच्या मुलाने मात्र सगळ्यांना भावुक करून टाकले. अमृता धोंगडे, प्रसाद जवादे, अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर यांच्याही कुटुंबियांनी सगळ्यांबद्दल चांगले बोललेले दिसले. आपल्याला बिग बॉसच्या घरात नेहमी आमंत्रित केले मात्र आजवर माझ्या घरातील कोणताच सदस्य मला भेटायला आला नाही. आई असते पण ती नेहमी आजारी असते त्यामुळे ती फक्त टीव्हीमधूनच मला भेटते.

राखीची ही खंत मराठी बिग बॉसने ऐकली आणि यावेळी तिचा बॉयफ्रेंड आदिल तिच्या भेटीला आला. बिग बॉसच्या घरात दाखल होताच आदिलने राखीला मराठीतून प्रपोज देखील केले. आरोहने ह्या आठवड्यात कॅप्टन होण्याचा मान पटकावला त्यामुळे तो डायरेकक्ट फायनलमध्ये पोहोचला अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र या घरातील कोणताच असा सदस्य नाही जो बिग बॉसची ट्रॉफी जिंकेल. कारण प्रेक्षकांनी बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा विनर अगोदरच ठरवून ठेवला होता तो म्हणजे तेजस्विनी लोणारी. तेजस्विनीने आपल्या संयमी खेळीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. मग कुठल्याही दिलेल्या टास्क मध्ये ती जीवतोड मेहनतिने खेळ खेळायची. कुठलाही आरडाओरडा न करता, आणि कुठलीही शिवीगाळ न करता तिने प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली होती. मात्र एका टास्क दरम्यान तेजस्विनीला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर असल्याने तिला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले होते. बिग बॉसच्या या निर्णयामुळे प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली होती. गेल्या सिजनमध्ये गायत्री दातारला देखील अशी दुखापत झाली होती मात्र तिला बिग बॉसने घरातच राहून विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यावरून तेजस्विनीवर अन्याय होतोय अशी प्रतिक्रिया दिली जात होती. तेजस्विनीला पुन्हा घरात बोलवावे अशी मागणी जोर धरताना दिसली.

काही दिवसांपूर्वी दुखापत वाढल्याने तेजस्विनीच्या हाताला शस्रक्रिया करण्यात आली अशी अफवा पसरली. या अफवेचे खंडन करत तिने कुठलीही शस्रक्रिया केली नसल्याचे स्पष्ट केले होते मात्र आता तेजस्विनी बाबत एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. तेजस्विनीला झालेली दुखापत आता पूर्णपणे बरी झालेली दिसत आहे. तेजस्विनीच्या हाताची पट्टी देखील निघाली असून ती आता या संकटातून बाहेर पडलेली आहे. नुकताच तेजस्विनीने एक व्हिडिओ शेअर केला त्यात ती आपल्या चाहत्यांना ख्रिसमसच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. तेजस्विनीचा हात आता पूर्णपणे बरा झाला असून ती बिग बॉसच्या घरात येऊ शकते अशी शक्यता तिच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे फिनालेमध्ये तेजस्वीनी प्रवेश करेल आणि ही ट्रॉफी जिंकेल अशी सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. याबाबत बिग बॉसचे आयोजक काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष्य लागून आहे.