माझा होशील ना मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेताना पाहायला मिळणार आहेत. आदित्य आणि सईची प्रेम कहाणी लग्नापर्यंत पोहचली पण त्यांच्या आयुष्यात पुढे अनेक घडामोडी घडल्या त्याच्या मामांनी तोच आदित्य ग्रुपचा मालक असल्याचं सांगितलं. पण आता जेडीचा मुलगा आदित्य बनून आल्याने मालिकेत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. नकली आदित्य बनून आलेला अभिनेता खऱ्या आयुष्यात नक्की आहे तरी कोण हे जाणून घेतल्यावर तुम्हाला देखील सुखद धक्का बसेल. अनेकांना हे माहित नसेल कि हा अभिनेता ह्याच मालिकेचा निर्माता देखील आहे.

माझा होशील ना मालिकेत नकली आदित्य बनून आलेल्या अभिनेत्याचं नाव आहे “सुजय हांडे”. सुजय हा ह्या मालिकेचा निर्माता देखील आहे. Ocean फिल्म कंपनीत त्यांनी काम केले आहे. ‘टेल्स व ब्लाइंडनेस’ या चित्रपटाची त्याने निर्मिती केली आहे. सुजय हा मराठीतील प्रसिद्ध गायक, लेखक आणि दिग्दर्शक “अशोक हांडे” ह्यांचा मुलगा आहे. मालिकेची निर्मिती करता करता तो ह्या मालिकेत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवू पाहताना दिसतो. मालिकेत तो जेडीचा मुलगा मॉन्टी ह्याची भूमिका साकारताना पाहायला मिळतोय. सुजयच्या पत्नीचे नाव पारुल हांडे असे आहे. पारुल देवल हांडे ह्यांना देखील अनेकदा तुम्ही टीव्हीवर पाहिलं असेलच. त्या सायकॉलॉजिस्ट आणि आर्ट बेस्ड थेरपिस्ट आहेत. अनेक टीव्ही कार्यक्रमांत आणि सोशिअल मीडियावर त्या लोकांच्या अडचणींची उत्तरे देताना पाहायला मिळतात. अभिनयापासून दूर राहून त्या आपल्या कामात व्यस्त असलेल्या पाहायला मिळतात. अभिनेता आणि निर्माता सुजय हांडे ह्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..