Home Entertainment या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रींचे नुकतेच झाले प्री वेडिंग फोटोशूट लवकर करणार लग्न

या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रींचे नुकतेच झाले प्री वेडिंग फोटोशूट लवकर करणार लग्न

8163
0
rasika sunil mehandi
rasika sunil mehandi

सुयश टिळक आणि आयुषी भावे याच्या लग्नानंतर आता आणखी एक अभिनेत्री लवकरच लग्नाच्या बंधनात अडकतात दिसणार आहे. ही अभिनेत्री आहे माझ्या नवऱ्याची बायको फेम शनया म्हणजेच रसिका सुनील. गेल्या काही वर्षापासून रसिका सुनील आणि आदित्य बिलागी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा पाहायला मिळाल्या होत्या. परदेशात असलेल्या आदित्यने रसिकाला हटके अंदाजात प्रपोज देखील केलं होतं. त्यानंतर रसिका पुन्हा एकदा माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत परतलेली पाहायला मिळाली. मालिकेने निरोप घेताच रसिका आपल्या लग्नाच्या घाईगडबडीत पाहायला मिळाली.

Rasika Sunil Dhabadgavkar pre wedding
Rasika Sunil Dhabadgavkar pre wedding

काही दिवसांपूर्वीच ठाण्यात तिने आपल्या लग्नातील साड्यांची खरेदी केली होती. त्यादरम्यान आदित्य बिलागी पुन्हा आपल्या मायदेशी परतला होता. आदित्य आणि सुनील ठाण्यातच वास्तव्यास आहेत आणि ते दोघे लवकरच लग्न करण्याच्या तयारीत देखील असलेले पाहायला मिळत आहेत. नुकतेच रसिकाने हातावर मेहेंदी काढून व्हिडीओ शूट केले आहे. त्यावरून हे दोघे प्रिवेडिंग फोटोशूट करत आहेत असं बोलले जात आहे. काहीच दिवसांपूर्वी रसिका आणि आदित्यने लग्न करत असल्याचे जाहीर केले होते त्यावरून हे दोघे आता गोव्यातील किनारपट्टीच्या ठिकाणी जाऊन प्रिवेडिंग फोटोशूट करताना दिसत आहेत. कमिंग सून असे म्हणत रसिकाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हीडीओत रसिकाच्या हातावर मेहेंदी सजलेली पाहायला मिळत आहे त्यावरून हे दोघे एंगेजमेंट करणार की लग्न असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. पण त्याचबरोबर या व्हिडीओ बाबत तिने ‘raskywedsadi’ असेही म्हटले आहे. त्यामुळे रसिका लवकरच आदित्य बिलागी सोबत लग्न करणार असल्याचे दिसून येते.

marathi actress rasika sunil pre wedding
marathi actress rasika sunil pre wedding

आदित्य बिलागी”. आदित्य हा एक उत्तम डान्सर असून कोरीओग्राफर, मार्शल आर्टस्, ड्रॉईंग याचीही त्याला विशेष आवड आहे. यासोबतच सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणूनही तो कार्यरत आहे. बॉलिवूड, हिपऑप अशा डान्सफॉर्ममधील त्याने केलेले नृत्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. २०१७ सालापासून लॉस एंजेलीसच्या bfunk डान्स क्लासमध्ये तो सहभागी झाला गेल्या वर्षी #bfunk मधील त्याने सादर केलेल्या नृत्याला देशभरातून नावाजले गेले या एका व्हिडिओमुळे आदित्य खूपच लोकप्रिय झाला त्या एकाच व्हिडिओमुळे त्याची दखल जगभरातील अनेक मान्यवर व्यक्तींनी घेतलेली पाहायला मिळाली होती. आदित्य आणि अभिनेत्री रसिका हे दोघेही लॉस एंजेलीसलाच भेटले तिथेच त्यांची खास मैत्रीही झाली होती. आता नवकरच ते विवाहबंधन अडकणार आहेत. आदित्य आणि अभिनेत्री रसिका सुनील ह्यांना त्यांच्या आयुष्याच्या या सुंदर सोहळ्यासाठी आमच्या काढून खूप खूप शुभेच्छा…

rasika sunil and aditya bilagi wedding
rasika sunil and aditya bilagi wedding

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here