येत्या ३० डिसेंबर २०२२ रोजी अभिनेते अशोक सराफ यांचा अभिनय असलेला वेड हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अनेकांना ह्या चित्रपटाचे वेध लागलेले आहे अभिनेता रितेश देशमुख, सलमान खान, अशोक सराफ, जेनेलिया देशमुख, शुभंकर तावडे असे अनेक कलाकार या चित्रपटात आहेत शिवाय अजय अतुलने ह्या सिनेमाला गाणी आणि म्युसिक दिल्याने चित्रपट प्रेक्षक आवर्जून पाहणार यात शंका नाही. अशोक सराफ हे या चित्रपटात जेनेलियाच्या वडिलांची भूमिका साकारताना पाहायला मिळत आहेत. आजवर अनेक मराठी आणि हिंदी मालिका तसेच चित्रपट अशोक मामांनी गाजवले आहेत. आजही तितक्याच उत्साहाने ते व्यावसायिक नाटक करताना पाहायला मिळतात. पण आज आपण चर्चा करणार आहोत ती अशोक सराफ यांच्या हातातील एका अंगठीची.

होय अशोक सराफ यांच्या हातातील ती अंगठी त्यांच्यासाठी खूपच खास आहे. गेली ४८ वर्ष त्यानी ती अंगठी आपल्या हातात तशीच ठेवली आहे. अशोक मामांच्या प्रत्येक चित्रपटात तुम्हाला हि अंगठी नक्की पाहायला मिळेल. एका चित्रपटात भिकाऱ्यांची भूमिका साकारताना देखील त्यांनी आपल्या हातातील ती अंगठी काढली नव्हती. मग हि अंगठी ते तितकी वर्ष का घालून आहेत असा सवाल अनेकांना नक्कीच पडला असेल. त्याच कारण देखील गती तसंच खास आहे. अशोक मामांचा एक मित्र विजय लवेकर यांनी अशोक मामांना हि अंगठी १९७४ साली दिली होती. विजय लवेकर हे त्यावेळी मेकअपआर्टिस्ट म्हणून काम पाहत होते. विजय लवेकर यांचं एक छोटंसं सोन्याचं दुकान देखील होत. अगदी उत्साहाने त्यांनी दुकानात बनवलेल्या वेगवेगळ्या डिझाईनच्या अंगठ्या ते स्टुडिओमध्ये अशोक सराफ यांना दाखवायला घेऊन आले. अशोक सराफ देखील इतक्या वेगवेगळ्या अंगठ्या पाहून खुश झाले पण त्यातली कोणती अंगठी निवडायची हे त्यांना काही समजेना. अंगठ्या पाहताना एक नटराजाची प्रतिमा कोरण्यात आलेली अंगठी त्यांच्या हातात आली लगेच ती त्यांनी आपल्या बोटात देखील घातली. ती अंगठी देखील अगदी त्यांच्या बोटात फिट्ट बसली. हि अंगठी माझ्यासाठी घडवलेली आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. हि अंगठी बोटात घातल्यापासून बरोबर ३ दिवसातच अशोक मामांना पांडू हवालदार हा चित्रपट मिळाला.

या चित्रपटानंतर एका मागून एक उत्तम चित्रपट त्यांच्या वाट्याला येऊ लागले. त्यांना त्यांच्या आवडत्या कलाकारांसोबत काम करता आलं. अशी अनेक कामे होती जी त्या अंगठीमुळे त्यांना मिळाली अस त्यांच्या मनात बसलं होत. हि अंगठी आपल्या बोटात आली तेंव्हा पासून सगळं काही व्यवस्थित घडतंय हे त्यांना कळून चुकलं. पुढे एकदा पत्नी निवेदिता जोशी यांनी त्यांना लग्नात सोन्याची अंगठी दिली होती मात्र काही दिवसानंतर निवेदिताने दिलेली ती सोन्याची अंगठी हरवली, पण ही अंगठी मी गेल्या ४८ वर्षांपासून माझ्याकडे जपून ठेवली आहे. तुम्हाला अशोक सराफ यांच्या प्रत्येक चित्रपटात हि अंगठी पाहायला मिळेल. येणाऱ्या वेड ह्या चित्रपटात देखील तुम्हाला त्यांच्या हातात हि अंगठी पाहायला मिळेल. असो अभिनेते अशोक सराफ यांना वेड या आगामी चित्रपटासाठी आणि आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..