सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. मालिकेचे आता अनेक भाग झाले असले तरी मालिकेतील उत्सुकता कायम टिकून ठेवण्यात मालिकेतील कलाकारांना यश मिळाले आहे. नुकतीच मालिकेतील अभिनेत्री प्रमिती प्रीत एक एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने मालिकेत पुढे न दिसण्याचे अस्पष्ट कारण सांगितले आहे. अभिनेत्री प्रमिती प्रीत हिने सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत हेमा जहागिरदार हे पात्र उत्तम रित्या साकारलं होत. पोस्ट लिहताना मला अश्रू अनावर होत असल्याचं तिने म्हटलं आहे.

अभिनेत्री प्रमिती प्रीत पोस्टमध्ये लिहते “माझे आयुष्य काल वेगळे होते, आणि आज ते … आहे. मी आता माझ्या जवळच्या प्रकल्पाचा भाग नाही, SMB. हे लिहिताना मला सर्व अश्रू अनावर झाले आहेत. पण शो पुढे गेलाच पाहिजे. मी त्यात आहे किंवा नाही हे माझे हृदय सुंदरासोबत नेहमीच असेल. सुंदर मनमाधे भरली सोबतचे हे वर्ष एक अद्भुत प्रवास आहे. मला त्यातील प्रत्येक सेकंदावर प्रेम होते. सर्वांचे खूप आभार. मी आता माझ्या आरोग्यास सामोरे जाण्यासाठी थोडा वेळ घेईन. आपण हेमाला दिलेल्या सर्व प्रेमाबद्दल धन्यवाद. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करते.” ह्या पोस्टमध्ये तिने तिच्या आरोग्यासाठी ह्या मालिकेतून माघार घेतलं असल्याचं नमूद केलं आहे. चेहऱ्यावर काही इन्फेक्शन झालं असल्यामुळे तिचा चेहरा खराब झाला होता. मालिकेतील तिच्या हटके लूकसाठी तिला अनेकदा वेगवेगळा मेकअप करावा लागत असल्यामुळे तिचं इन्फेक्शन आणखीनच वाढू लागलं असल्याचं समजत. या कारणामुळेच तिने हि मालिका सोडली असल्याचं तिने नमूद केलं आहे. मालिकेतून ती बाहेर पडली असली तरी मालिकेशी ती वर्षभर जोडली गेली तिच्या आठवणी तिच्या हृदयात कायम राहतील असं ती म्हणते.

अभिनेत्री प्रमिती प्रीत हिचे आई आणि वडील दोघेही शिक्षण क्षेत्राशी निगडित आहे. आपली मुलगी शिकून आयएएस ऑफिसर व्हावी अशी वडिलांची इच्छा होती पण मुलीला अभिनयात रस आहे असं पाहून त्यांनी तिला मास कम्युनिकेशन करायला सांगितलं. “तू माझा सांगाती” आणि गर्जा महाराष्ट्र”” ह्या मालिकेत ती पाहायला मिळाली. “तू माझा सांगाती” मालिकेत तुकाराम महाराजांची पत्नी आवली तिने साकारली होती. आवली भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली होती. त्यामुळेच तिला सुंदरा मनामध्ये भरली हि मालिका मिळाली असल्याचं देखील बोललं जात. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत तिची निगेटिव्ह भूमिका असली तरी ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. अभिनेत्री प्रमिती प्रीत लवकरच पूर्णपणे बरी होऊन पुन्हा मालिकेत पाहायला मिळो अशी प्रार्थना आजवर तिने साकारलेला अभिनय प्रेक्षक कधीही विसरणार नाहीत हे तितकंच खर.