टी२० विश्वकप मध्ये काळ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा सामना रंगला. इंग्लंडने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया खेळायला आणि त्यांनी सर्वबाद १२५ धावा काढल्या. अहो हे मराठी अभिनेत्यांबद्दलच सांगायचं सोडून तुम्ही क्रिकेट बद्दल काय बोलताय असा अनेकांना प्रश पडला असेल. मित्रानो थोडं थांबा कि आपली गाडी इथूनच सुरु होतेय. आज रविवार ३१ ऑक्टोबर २०२१ भारत आणि न्यूझीलंड यांचा सामना रंगणार म्हणून कदाचित झी वाहिनीने शक्कल लढवून १ दिवस आधीच म्हणजे शनिवारीच झी मराठी अवॉर्ड २०२१ प्रक्षेपित करायचं ठरवलं असेल. आणि सोने पे सुहागा म्हणजे शनिवारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांचा सामना देखील इंग्लंडने लवकरच म्हणजे अवघ्या ११.४ ओव्हर मधेच जिंकला. त्यामुळे घरी पुरुषमंडळीना देखील हा सामना पाहता आला आणि सामना झाल्या झाल्या ह्या रंगतदार सोहळ्याचा आनंद देखील सर्वाना घेता आला.

हा झाला सांगायचं मुद्दा पण त्यामुळे झी ने ह्यापूर्वी दिलेल्या अवॉर्ड सोहळ्यात प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलाय आणि कालचा झालेला सोहळा देखील उत्तमच झाला होता. अभिनेत्यांनी आणि अभिनेत्रींनी केलेली मेहनत, कॉस्ट्यूम डिझायनर, टाईट्समन, पासून सर्वानीच केलेली मेहनत खुलून आलेली दिसत होती. जमेची बाजू म्हणजे गोविंदा, कतरीना कैफ आणि रोहित शेट्टी ह्यांनी देखील ह्या सोहळ्यात हजेरी लावली. नुसती हजेरीच नाही तर स्टेजवर येऊन त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन देखील केलं. वामन हरीपेठे अँड ज्वेलर्स हे या सोहळ्याचे प्रस्तुतकर्ते होते. सेटवर चला हवा येउ द्या मधील कलाकार नेहमीच अश्या सोहळ्यात उत्तम कलाकारी दाखवून प्रेक्षकांना हसवताना पाहायला मिळतात. विशेष करून भाऊ कदम यांचा अभिनय आणि त्यांनी सेटवर कतरिनाची घेतलेली फिरकी. त्यानंतर स्टेजवर अभिनेत्यांना बोलवून त्यांच्याकडून वजन उचलून व्यायाम करण्याचा तो क्षण अफलातूनच ठरला. ह्या पूर्वी देखील अनेक बॉलीवूड कलाकार झी वाहिनीच्या अश्या खास सोहळ्यात येतात पण कालचा झालेला सोहळा जरा हटकेच होता ह्यात तिळमात्र शंका नाही.

झी वाहिनीने अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. झी आणि मराठी माणसाचं नातं अनेक वर्ष टिकून आहे पण गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या मालिका पाहून लोक चांगलेच कंटाळले होते. त्याच त्याच मालिका पुन्हा पुन्हा नवनवे आणि जुने प्रसिद्ध कलाकार भरती करून दाखवायचा ट्रेंड आला आणि झी वाहिनीवर प्रेक्षकांची नाराजी दिसून आली. पण झी वाहिनीने एक मोठा निर्णय घेतला आणि एकाच महिन्यात ह्या सर्व जुन्या मालिकांच्या जागी नव्या मालिका सुरु केला. आणि ह्यात झी वहिनीला चांगलं यश देखील मिळाला. मन उडू उडू झालं, माझी तुझी रेशीमगाठ, मन झालं बाजींद, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ह्या मालिका सद्य चांगल्याच प्रसिद्धीच्या झोतात आहेत. मुळात झी वाहिनीवरील अभिनेत्यांनी कधीच प्रेक्षकांची निराशा केली नाही पण लेखकाला नवीन काही दाखवता आलं नाही आणि त्यामुळेच झी वहिनीला अशी वेळ आल्याचं दिसून आलं. पण पुन्हा जोमाने नव्या उमीदीने झी वाहिनीने उचलेल हे योग्य पाऊल असल्याचं आता प्रेक्षकांना देखील दिसून येतंय. मी मराठी झी मराठी हे वाक्य पुन्हा घराघरात उमलताना दिसतंय.