Home Movies बिगबॉस फेम तेजस्विनी लोणारीने नुकतच घेतलं श्री तिरुपती बालाजीच्या दर्शन

बिगबॉस फेम तेजस्विनी लोणारीने नुकतच घेतलं श्री तिरुपती बालाजीच्या दर्शन

878
0
tejaswini lonari balaji
tejaswini lonari balaji

मराठी बिगबॉसच्या ४ थ्या सिजनची सर्वात स्ट्रॉंग कन्टेस्टंट म्हणून अभिनेत्री तेजस्विनी लोणारींकडे पाहिलं गेलं. पण बिगबॉसच्या घरात तिच्या हाताला दुखापत झाली आणि डॉक्टरांच्या सल्यानुसार तिला काही दिवस सक्तीची विश्रांतीसाठी बिगबॉसच्या घराच्या बाहेर जावं लागलं. अनेक दिवस मराठी चित्रपट सृष्टीपासून दूर असलेली तेजस्विनी पुन्हा बिगबॉसमुळे चर्चेत आली. तिचे असंख्य चाहते तिची बिगबॉसच्या घरात येण्याची वाट पाहत आहेत कारण गेल्या काही दिवसांपूर्वी तिच्या हाताला लागलेली दुखापत आता नीट झालेली दिसत आहे. आता पुन्हा तेजस्विनी चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे पण त्याच कारण थोडं वेगळं आहे. नुकतीच ती देव दर्शनाला जाऊन आली आहे.

actress tejaswini lonari tirupati balaji
actress tejaswini lonari tirupati balaji

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने नुकतंच बालाजीचे दर्शन घेतले आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर करत ती म्हणते ” नुकतीच श्री तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेले होते. तिथे जाऊन खूप छान वाटलं. प्रत्यक्षात बालाजीचे अखंड रूप पाहताना, अंगावर शहारा आला. या देवस्थानाची एक वेगळीच ऊर्जा आहे. नवीन वर्षाची उर्जात्मक आणि सकारात्मक सुरुवात करण्यासाठी एका विलक्षण अनुभूतीचा आनंद मी घेतला. माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या प्रेक्षकांसोबत मला हा अनुभव शेअर करायचा होता. तुम्ही माझे कुटुंब असून तुमच्या सर्वांच्या वतीने मी बालाजीचे दर्शन घेतले आहे. माझ्यासोबत तुम्हा सर्वांचेही नवीन वर्ष चांगले जावो अशी मी प्रार्थना केली आहे. आपण असेच एकत्र आणि वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात राहू. गोविंदा रे गोविंदा.. ” तेजस्विनीच्या ह्या पोस्टमध्ये बिगबॉसमध्ये जाण्याचा काहीही उल्लेख केला गेला नाही. आता बिगबॉस चा सीजन देखील संपत आता आहे. त्यामुळे तेजस्विनी पुन्हा एन्ट्री घेईल याची शक्यता कमीच वाटते. पण तरीदेखील तिच्या चाहत्यांना ती पुन्हा बिगबॉसच्या घरात जाईल अशी आशा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here