आई कुठे काय करते हि मालिका अनेक दिवसांपासून वेगवेगळी वळणे घेताना पाहायला मिळतेय. फारच कमी दिवसांत आई कुठे काय करते मालिकेला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. पण मालिकेला प्रसिद्धी मिळाली कि तशीच चालू ठेवायची असं गणितच आजकाल पाह्यला मिळत. पण ह्यामुळे मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांची चांगलीच हिरमोड होते. चांगली मालिका म्हणून पाहायची मग तीच कंटाळवाणी होईपर्यंत त्यात नवनवे कलाकार भरायचे हा नवा ट्रेंड आलेला पाहायला मिळतोय. आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधतीचा पती अभिनेता मिलिंद गवळी याने चाहत्यांसाठी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.

आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेता मिलिंद गवळी लिहतो ” आयुष्याच गणित बिघडलं की ते सुधारता येईल का? अनिरुद्ध देशमुख एकामागे एका मागे एक चुका करत चाललाय, बारा-तेरा वर्षापूर्वी त्याच्या आयुष्याचं गणित चुकलं, त्याच्याकडून एक चूक झाली, ती अनिरुद्ध ला सुधारता आली असती का? आली असती तर अनिरुद्ध सारखा सुखी माणूस कोणीच नसतात, आणि त्याच्याबरोबर त्याचा परिवार ही सुखी राहिला असता, असं म्हणतात ना की एक खोटं लपवण्यासाठी 100 वेळा खोटे बोलावे लागते, तसंच आयुष्यात एक मोठी चूक केली की त्याच्या मागे तुम्ही शंभर चुका करत राहता. वेळीस जर ती चूक कबूल करून सुधारली नाही तर आयुष्याची फडफड होऊ शकते, फक्त त्याची स्वतःची नाही तर त्याच्याबरोबर जोडलेल्या त्याच्या नातेवाईकांची मित्रमंडळींची स्वकीयांची सगळ्यांची, किती घरांमध्ये हीच परिस्थिती आहे, मनं दुखावली जातात, काहींमध्ये अहंकार असतो, दुसऱ्यांचा विचार करत नाहीत, लोकं स्वार्थी होतात, आणि मग त्याच्यावर एकच उपाय, उपाय म्हणजे , “त्यापेक्षा आपण वेगळे राहूया” आणि लोक वेगळी होतात.

त्यात सगळ्यांचं नुकसान होतं, कळत नाही बऱ्याच लोकांना, एकत्र कुटुंब सारखं सुख या जगामध्ये कुठेच नाही, आई वडील आजी आजोबा मुली सुना नातवंड पतवंडं काका मावशी आत्या मामा आणि काही अतिशय जवळची मित्रमंडळी, हल्ली दिवाळी ला सुद्धा एकत्र येत नाहीत. हे सगळं बदलेल का? येतील का लोक परत एकत्र छान सण साजरा करायला, दुरावलेली माणसं परत एकत्र आली किती मजा येईल, अनिरुद्ध देशमुख सुधारला तर किती मजा येईल? डोळे उघडतील का त्याचे? Hopefully…Milind Gawali…” अभिनेता मिलिंद गवळी यांनी अशी पोस्ट लिहीत अनेकांचे डोळे उघडले आहेत. हि मालिका आहे पण खऱ्या आयुष्यात आपण सत्याची बाजू मांडली आणि सगळ्यांना सोबत घेऊन चाललो तर हे सोन्याहून पिवळं असेल आणि सण साजरे करताना सुखावलेली आणि दुखावलेली माणसे एकत्र येतात एकत्र राहण्यातच खरी मजा आणि खरा आनंद आहे असं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.