सुयश टिळक आणि आयुषी भावे याच्या लग्नानंतर आता आणखी एक अभिनेत्री लवकरच लग्नाच्या बंधनात अडकताना दिसणार आहे असे अभिनेत्री रसिका सुनील हिच्याबाबत म्हटले जात होते. माझ्या नवऱ्याची बायको फेम शनया म्हणजेच रसिका सुनील गेल्या काही दिवसांपासून लग्न करत असल्याची चर्चा सुरू झाली होती. या बातमीला आता नुकताच पूर्णविराम मिळालेला दिसत आहे कारण रसिकाने आदित्य बिलागी सोबत १८ ऑक्टोबर २०२१ रोजी लग्नगाठ बांधली असल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्या लग्नाबाबत कुठलीही जाहीर बातमी न देता आणि चाहते तसेच मिडियापासून लपवून ठेवून तिने लग्न केलेले पाहायला मिळत आहे.

आदित्य बिलागी आणि रसिका ह्यांनी गोव्याच्या बीचवर आपल्या लग्नाचा हा सोहळा पार पाडला होता. एका पोस्टद्वारे रसिका गोव्याला जात असल्याचे सांगताना दिसली होती. त्यानंतर तिने हातावर मेहेंदि सजलेला एक व्हिडिओ शेअर केला होता त्यावरून हे दोघे प्रिवेडिंग फोटोशूट करण्यासाठी गोव्याला दाखल झाले असे वाटले होते मात्र हे व्हिडीओ त्यांच्या लग्नातलेच आहेत असे आता स्पष्ट झाले आहे. आजवर अनेक मराठी कलाकारांनी गुपचूप आणि कुणालाही खबर न देता लग्न केलेली पाहायला मिळाली होती आता या यादीत रसिकाने देखील बाजी मारलेली दिसून येत आहे. मागील काही वर्षापासून रसिका सुनील आणि आदित्य बिलागी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा पाहायला मिळाल्या होत्या. परदेशात असलेल्या आदित्यने रसिकाला हटके अंदाजात प्रपोज देखील केलं होतं. त्यानंतर रसिका पुन्हा एकदा माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत परतलेली पाहायला मिळाली. मालिकेने निरोप घेताच रसिका आपल्या लग्नाच्या घाईगडबडीत पाहायला मिळाली.

रसिकाने त्याच्यासोबत लग्नगाठ बांधली तो आदित्य बिलागी कोण आहे हा प्रश्न अनेकांना पडला होता. आदित्य हा एक उत्तम डान्सर असून कोरीओग्राफर, मार्शल आर्टस्, ड्रॉईंग याचीही त्याला विशेष आवड आहे. यासोबतच सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणूनही तो कार्यरत आहे. बॉलिवूड, हिपऑप अशा डान्सफॉर्ममधील त्याने केलेले नृत्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. २०१७ सालापासून लॉस एंजेलीसच्या bfunk डान्स क्लासमध्ये तो सहभागी झाला गेल्या वर्षी #bfunk मधील त्याने सादर केलेल्या नृत्याला देशभरातून नावाजले गेले या एका व्हिडिओमुळे आदित्य खूपच लोकप्रिय झाला त्या एकाच व्हिडिओमुळे त्याची दखल जगभरातील अनेक मान्यवर व्यक्तींनी घेतलेली पाहायला मिळाली होती. आदित्य आणि अभिनेत्री रसिका हे दोघेही लॉस एंजेलीसलाच भेटले तिथेच त्यांची खास मैत्रीही झाली होती. आदित्य बिलागी आणि अभिनेत्री रसिका सुनील ह्यांना त्यांच्या आयुष्याच्या या सुंदर वाटचालीसाठी आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा…