आई कुठे काय करते मालिका अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती आता मालिका संपायच्या वाटेवर आली तरी देखील मालिकेत प्रेक्षांची उत्सुकता कायम आहे. अरुंधतीने आपलं घर सोडलं आणि आता ती तिच्या पायावर उभी राहणार असं चित्र पाहायला मिळतंय. आई कुठे काय करते मालिकेत आईची मुख्य भूमिका साकारणाऱ्या म्हणजेही अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे “मधुराणी गोखले” तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

मधुराणी गोखले हिला तुम्ही अनेक मराठी चित्रपटात पाहिलं असेलच मणीमंगळसूत्र आणि नवरा माझा नवसाचा ह्या चित्रपटांत तर तुमचं आमचं सेम असतं ह्या नाटकात तिची भूमिका विशेष पसंतीस उतरली होती. तर गोड़ गुपित ह्या चित्रपटाची निर्मिती देखील तिने केली आहे. त्यानंतर दिग्दर्शक आणि निर्माता असलेले प्रमोद प्रभुळकर ह्यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. प्रमोद प्रभुळकर यांनी ना मुख्यमंत्री गणप्या गावडे आणि युथटयूब सारखे मराठी सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. आपल्या पतीसोबत त्या नव्या कलाकारांना अभिनयाचे प्रशिक्षण देण्यात मग्न राहिल्या. त्यांना एक मुलगी देखील आहे तिचं नाव “स्वराली”असे आहे. त्यानंतर मात्र बरीच वर्ष त्या अभिनयापासून दूर राहिल्या. लगीर झालं जी मधील अनेक कलाकार हे त्यांच्याच कार्य शाळेतील विद्यार्थी आहेत. पण आता आई कुठे काय करते ह्या मालिकेच्या माध्यमातून त्या पुन्हा अभिनय क्षेत्रात दिसू लागल्या. साधी भोळी एक सामान्य महिलेच्या आयुष्यात येणाऱ्या ह्या पात्राने अनेकांची मने जिंकली आहेत. ह्याच सर्व श्रेय अभिनेत्री मधुराणी गोखले ह्यांनाच जाते. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुळकर ह्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…