Home Entertainment अशा वेळी एका बापाची मनःस्थिती कशी असते मराठी मालिकेतील अभिनेत्याची पोस्ट...

अशा वेळी एका बापाची मनःस्थिती कशी असते मराठी मालिकेतील अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

1620
0
actor kiran mane photo
actor kiran mane photo

सध्या सोशल मीडियावर आर्यन खान आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र या सर्व घडामोडी घडत असताना स्वतः शाहरुख खान आपल्या मुलावर झालेल्या ह्या आरोपांवर काहीच बोलला नाही. ना कधी त्याने मीडियाला स्पष्टीकरणदेखील दिलं नाही. अशा वेळी बापाची मनःस्थिती कशी झाली असेल याबद्दलची अभिनेता किरण माने यांनी एक पोस्ट लिहिली आहे. अभिनेता किरण माने यांनी अनेक मराठी मालिकांतून अभिनय केला आहे. ”माझ्या नवऱ्याची बायको आणि मुलगी झाली हो” या मालिकेतून ते घराघरात पोहचले. त्यांची बापाच्या मनाचा ठाव घेणारी ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. अभिनेता किरण माने यांनी आजवर आपल्या शैलीतून अनेक पोस्ट लिहिल्या आहेत त्यात त्यांची ही पोस्ट देखील लोकांना आवडली आहे. आपल्या पोस्टमध्ये ते नेमके काय म्हणाले ते पाहुयात…

shahrukh khan son aryan
shahrukh khan son aryan

अभिनेते किरण माने म्हणतात “हे बघ भावा, तुझा पोरगा दोषी असंल तर कायद्यानं त्याला काय शिक्षा होईल ती भोगावी लागंल. पर्याय नाय. पन.. त्यो जर निर्दोष आसंल तर कुनाच्या बापाचा बाप बी त्याला शिक्षा करू शकत नाय ! कायद्यापेक्षा मोठ्ठा मानूस पैदा झाला नाय या देशात अजून पन नशिबाशी चाललेल्या या लढाईत तू जो संयम ठेवलायस तो पाहून तुझा लै लै लै अभिमान वाटला गड्या. तू मिडीयाफुडं यिवून घसा फाडून सोत्ताची बाजु मांडायचा धसमुसळेपना केला नाय… कुठल्या राजकिय नेत्याच्या किंवा पक्षाच्या वळचनीला जाऊन पोराच्या सुटकेची भिक मागीतली नाय.. या देशातल्या कुठल्याबी अधिकार्‍याचं डोळं पांढरं होत्याल एवढा पैसा चारून तू आत्तापर्यन्त पोराला बाहेर काढू शकला असतास.. पन तू ते नाय केलंस ! तू लाच दिली असतीस तर पयल्याच सुनावनीला तो बाहेर असता.. तू तारीख पे तारीख सहन करत वाट पहातोयस… कारन तुझा या देशातल्या ‘कायद्या’वर विश्वास हाय ! आपलं पोटचं पोर असल्या आरोपात अडकनं आनि आपन काहीच न करू शकनं याचं दु:ख – याची वेदना काय असते, ती ओळखायला आपन स्वत: मोठ्या मनाचा ‘बाप’ असनं गरजेचं असतं !

shahrukh khan photo
shahrukh khan photo

कद्रू मनाची बांडगुळं मनाला यिल ती टीका करत्यात ती ऐकून तुझ्या काळजाला घरं पडत असत्याल तू एकांतात हतबल होऊन रडतही असशील पन तू बादशाह हायेस भावा किंग खान हायेस ते तू दाखवून देनार !! आमचा तुझ्यावर विश्वास आहे जे समोर येईल त्याला तू निधड्या छातीनं सामोरा जाशील !!! लढ भावा लढ.. तू लढवय्या हायेस.. तुझ्या पोरानं गुन्हा केला असंल तर त्याला शिक्षा होईल. त्याचं खापर तुझ्यावर फोडन्याइतके भंगार मेंदूचे आम्ही नाही आहोत. तुझा पोरगा निर्दोष ठरला तर मात्र तुझ्यावर खोटे आरोप करनार्‍यांची थोबाडं ठेचली जानार आहेत. त्यावेळी बी तू ‘माज’ करनार नाहीस याची खात्रीय आम्हाला कारण तू खर्‍या अर्थानं ‘शाह’-रूख आहेस.. राजा आहेस.. हार कर जीतने वाला ‘बाजीगर’ आहेस ! लब्यू दोस्ता”. किरण माने. अभिनेता किरण माने ह्यांनी शाहरुखच्या मुलाचं अजिबात समर्थन केलं नाही या ठिकाणी फक्त एका बापाची कहाणी मांडली आहे हे पुन्हा एकदा सांगावस वाटतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here