तुझी माझी रेशीमगाठ हि मालिका झी मराठी वाहिनीवर २३ ऑगस्ट २०१२१ पासून प्रकाशित करण्यात येतेय. तुझी माझी रेशीमगाठ या मालिकेचे फक्त ५ भाग झाले आहेत पण मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून साथ मिळतेय. या मालिकेतून श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे हे दोन कलाकार छोट्या पडद्यावर पाहायला मिळत आहेत. मालिकेच प्रमुख वैशिट्य ठरलाय ते त्या मालिकेत साकारत असलेल्या छोट्या कलाकार “मायरा वायकुळ” हिच्यामुळे. मायरा वायकुळने टिक टॉक सारख्या व्हिडिओजच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. टिक टॉक स्टार म्हणूनही तिची ओळख आहे.

इन्स्टाग्रामवरही तिचे खूप फॉलोअर्स आहेत. युट्युबवर Myra’s corner नावाने मायराचे चॅनल आहे. त्यावर तिचे आतापर्यंत ८६ हजार फॉलोअर्स झाले आहेत. तिच्या या चॅनलवर तिचे अनेक व्हिडीओज तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी हळदी कुंकू समारंभ ते तिने बनवलेला केक तुम्हाला या व्हिडिओतून पाहायला मिळेल. मायरा सध्या आपल्या कुटुंबासोबत मुंबईत वास्तव्यास आहे. मायराचे वडील गौरव वायकुळ आणि आई श्वेता थोरात वायकुळ हे दोघेही मायराला सतत प्रोत्साहन देत असतात. आपली लाडकी लेक काहीतरी खास आहे या उद्देशाने त्यांनी सुरुवातीला तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले. ह्यामुळेच तिला हि मालिका मिळालीय अशी चर्चा आहे. पण तिचा अभिनय पाहता ती एक उत्तम अभिनेत्री आहे असं लक्षात येत. तिची निरागसता आणि बोलण्याची स्टाईल ह्यावर प्रेक्षक फिदा झालेले पाहायला मिळतायेत. ह्या मुलीमुळेच मालिकेला नवा रंग चढलाय असं म्हणायला हरकत नाही. सगळ्या रटाळवाण्या मालिकांना कंटाळून आता नवीन वेगळं काहीतरी पाहायला मिळतंय त्यामुळे प्रेक्षकांनी ह्या मालिकेला पसंती दाखवली आहे. दुसऱ्या मालिका बंद करून ह्या मालिकेला १ तास द्या अशी प्रतिक्रिया देखील अनेक प्रेक्षक करताना पाहायला मिळतंय.