कपिल शर्माच्या शो मधून काही काळासाठी त्याच्या बायकोची भूमिका विनोदी अभिनेत्री “सुगंधा मिश्रा” साकारत होती. सुगंधा मिश्रा एक कॉमेडियन आणि गायिका म्हणूनही हिंदी सृष्टीत चांगलीच ओळखली जाते. अनेकदा वेगवेगळ्या मंचावर लता मंगेशकर यांची हुबेहूब नक्कल करून तिने प्रेक्षकांची मने देखील जिंकून घेतली आहेत. सारेगमच्या रिऍलिटी शोमध्येही तिने पार्टीसिपेट केलेले होते. सुगंधा मिश्रा तिच्या नुकत्याच पार पडलेल्या एंगेजमेंटमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत येत आहे.
दोन दिवसांपूर्वी सुगंधाने मराठमोळा कलाकार “संकेत भोसले” याच्या सोबत एंगेजमेंट केली आहे. संकेत भोसले हा देखील एक कॉमेडियन म्हणून हिंदी सृष्टीत चांगलाच परिचयाचा बनला आहे. द कपिल शर्मा शो, सुपरनाईट विथ ट्यूब लाईट द ड्रामा कंपनी अशा विविध शो मधून विनोदी कलाकार म्हणून तो ओळखला जातोच शिवाय सलमान खान, संजय दत्त, फरहान अख्तर, कैलाश खेर यांच्या मिमिक्री तो खूपच सुंदर रित्या सादर करताना दिसतो. सुगंधा आणि संकेत यांची एकाच शोमध्ये ओळख झाली होती त्यावेळी ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याची अफवा मीडियाच्या माध्यमातून पसरली होती. या अफवांमुळेच दोघेही एकमेकांच्या खरोखरच प्रेमात पडले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. २०२० साली मोठ्या थाटात आपण लग्न करावे अशी तिची ईच्छा होती मात्र येणाऱ्या संकटांमुळे तिचे लग्न दोनदा पुढे ढकलण्यात आले. आता लवकरच सर्व सुरक्षा बाळगून मी संकेत सोबत लग्न करणार आहे असेही तिने मीडियाशी बोलताना सांगितले त्यामुळे सुगंधा आता लवकरच महाराष्ट्राची सून होणार अशी चर्चा रंगली आहे.