Home Entertainment खूप काही घडलंय खूप काही बिघडलंय…. म्हणत विशालने दिल स्पष्टीकरण

खूप काही घडलंय खूप काही बिघडलंय…. म्हणत विशालने दिल स्पष्टीकरण

3169
0
actor vishal nikam
actor vishal nikam

मराठी बिग बॉसच्या अद्भुत नगरी अवतरली होती या अद्भुत नगराचा राजा दादूस बनले होते. तर इतर सदस्यांना देवदूत आणि राक्षस बनण्याचा टास्क दिला होता. टास्क दरम्यान राक्षसांना देवदूतांचा छळ करून त्यांचा संयम तोडायचा होता. बिग बॉसच्या घरात आजवर विशाल आणि विकास दोघांनी उत्तम खेळ खेळून प्रेक्षकांची मने जिंकली होती. मात्र गेल्या काही दिवसांच्या घडामोडी पाहता विशाल निकम आता अनफेअर खेळत असल्याच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. सोनाली सोबत झालेल्या वादानंतर विशाल पुन्हा एकदा विकास सोबत वाद घालताना दिसला. तर राक्षस बनलेला विशाल विकासला टार्गेट करताना दिसला. टास्कदरम्यानच्या विशालच्या खेळीवर विकास नाराज झाला होता.

big boss marathi
big boss marathi

तू आता मला डेव्हीलच्या भूमिकेत नको यायला लावूस असे विशाल म्हणताच विकासने त्याच्या वागण्यावरून तू डेव्हीलच आहेस यायची गरज नाही.. असे म्हटले होते. विशालने हा टास्क अतिशय उत्तम रित्या निभावला असं त्याच्या चाहत्यांचं म्हणणं आहे मात्र दुसरीकडे विशाल आता अनफेअर खेळतोय असे म्हटले जात आहे. विशाल आता गेम खेळता खेळता आपल्याच ग्रुपच्या लोकांना टार्गेट करत आहे असे मत अनेकांनि व्यक्त केलं आहे. मात्र कालचा टास्क मी खूप चांगला खेळलो कारण सर्वांना माझा खूप राग आला होता. मी राक्षस बनून जे काही केलं तो एक गेमचा भाग होता यामुळे अनेकांची मनं मी दुखावली आहेत. मी माझं काम चोख बजावलं आहे. सर्वात वाईट राक्षस बनून खरं तर हा टास्क मी जिंकला आहे असे विशालचे मत आहे. त्याबाबत तो अशी प्रतिक्रिया देतो की ‘टास्क म्हंटला आणि मी १००% देणार नाही असं कसं होईल? टास्कच्या रणांगणात भावनांचा कस लागतो, ज्यामध्ये कधी पराभव तर कधी विजय होतो. ह्या अद्भुत नगरात जो थांबला, तो तिथेच संपला….

vishal nikam big boss marathi
vishal nikam big boss marathi

माझं ह्या अद्भुत नगरावर विशालप्रेम जडलंय, आणि त्यामुळेच खूप काही घडलंय आणि बिघडलंय!! राक्षस होऊन जो मी धुडगूस आज घातला, त्याने अनेकजण दु़खावले. माझ्या परफॉर्मन्स ची ती पोचपावती मी समझतो! आज मी वाईट वाटलो असेल तर मनापासून माफी मागतो…’ विशालच्या अशा वागण्याने विकास मात्र दुखावला आहे. पुढे जाऊन या दोघांतील मैत्रीचे नाते टिकून राहावे अशी ईच्छा या दोघांच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे. शिवाय विशाल चांगला खेळतो पण त्याने आपल्या टीमला देखील सपोर्ट करावा आणि त्यांना सोबत घेऊन पुढे जावे असे म्हटले आहे. विशालने टास्क उत्तम खेळला मात्र जवळच्याच व्यक्तींच्या आणि पर्यायाने चाहत्यांच्या भावना दुखवू नयेत अशी एक अपेक्षा प्रेक्षक करताना दिसत आहेत. असो बिगबॉस सीजन ३ मराठीच्या स्पर्धकांना पुढील खेळासाठी खूप खूप शुभेच्छा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here